कमला हॅरिसनंतर भारतातील आणखी एका लेकीचा US मध्ये डंका, बायडन यांच्या सल्लागार समितीत मिळवलं स्थान

तामिळनाडूतीन आणखी एक लेक नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या कोव्हिड-19 सल्लागार समितीत सामील झाली आहे.

तामिळनाडूतीन आणखी एक लेक नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या कोव्हिड-19 सल्लागार समितीत सामील झाली आहे.

  • Share this:
    न्यूयॉर्क, 12 नोव्हेंबर : काही दिवसांपूर्वीच, तामिळनाडूच्या तिरुवरुर जिल्ह्यातील थुलासेंद्रापुरम-पैनगनाडु गावात अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपराष्ट्राध्यक्ष झालेल्या कमला हॅरिस यांच्या विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. आता तामिळनाडूतीन आणखी एक लेक नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या कोव्हिड-19 सल्लागार समितीत सामील झाली आहे. तमिळनाडूतील इरोडमधील पेरुमापलयम या गावातील डॉ. सेलिने गॉउन्डेर यांनी या सल्लागार समितीत निवड झाली आहे डॉ. सेलिने गॉउन्डेर न्यूयॉर्क विद्यापीठातील ग्रॉसमॅन स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये मेडिसिन आणि संसर्गजन्य रोग विभागात क्लिनिकल सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्या HIV/ संसर्गजन्य रोग तज्ज्ञ, इंटर्निस्ट, महामारी तज्ज्ञ, पत्रकार आणि चित्रपट निर्मात्या म्हणून देखील काम करतात. 2016 मध्ये अमेरिकेच्या इन्फेक्शस डिसिज सोसायटीच्या फेलो म्हणूनही त्यांची निवड झाली होती. 2017 मध्ये पीपल मॅगझिनने त्यांना जगात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या 25 महिलांमध्ये स्थान दिलं होतं. डॉ. सेलिने यांचे वडील नटराजन गॉउन्डेर हे मूळचे तमिळनाडूतील पेरुमापलयम गावचे रहिवाशी होते. 1960च्या दशकात ते अमेरिकेत गेले व बोइंग कंपनीत काम करू लागले. एका खासगी चॅनलच्या रिपोर्टर सोबत बोलताना ग्रामस्थ म्हणाले की, "सेलिने खूप उदार आणि मानवतेने परिपूर्ण आहे. ती अमेरिकेत असतानाही तिला गावातील लोकांची चिंता वाटते. लॉकडाऊनच्या वेळी गावातील मुलांची उपासमार होऊ नये म्हणून तिने तिच्या गावातील घराच्या दारात आम्हाला भोजन देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली होती. भारतात लॉकडाऊन जाहीर होण्यापूर्वीच त्यांनी आम्हाला कोव्हिड-19 बद्दल जागरूक केलं होतं आणि ग्रामस्थांना सुरक्षित ठेवण्याबाबतच्या सर्व मार्गदर्शक सूचनांची यादी सुद्धा पाठवली होती." आई फ्रान्सची तर बाबा भारतीय सेलिने मंगळवारी ट्विटरच्या माध्यमातून म्हणाल्या, "माझ्या तामिळनाडूच्या लोकांनी वृत्तपत्रांतून माझ्या नियुक्तीशी संबंधित बातम्यांचे स्क्रिनशॉट पाठवून शुभेच्छा दिल्यावर फार अभिमान वाटतो”. त्या म्हणाल्या की, "बरेच लोक विचारतात की मी माझी जातीच का आडनाव ठेवले आहे? तर माझे वडील 1960 मध्ये अमेरिकेत आले. त्यांना नटराजन म्हणून बोलावण्यास अमेरिकनना त्रास व्हायचा. त्याच्यापेक्षा गॉउन्डेर म्हणणं खूपच सोपं होतं. म्हणून त्यांनी पुढे हेच नाव ठेवले". सेलिनेची आई फ्रान्सची असून तिने आरोग्य आणि संसर्गजन्य रोग रोखण्याच्या कार्यात एक अनेक वर्षं काम केलं आहे. आरोग्यशास्त्रातील ही आवड सेलिनेला तिच्या आईकडूनच वारसा म्हणून मिळाली आहे. डॉ. सेलिने यांनी दक्षिण आफ्रिका, लेसोथो, मलावी, इथिओपिया आणि ब्राझील येथे TB आणि HIV चा अभ्यास केला आहे आणि गिनीमध्ये इबोला सहाय्यक म्हणून स्वेच्छेनी काम केलं आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published: