दुबई, 05 एप्रिल: एका वेब साइटच्या प्रसिद्धीसाठी नग्न अवस्थेत फोटोशूट (Naked Photo shoot in Balcony) करणाऱ्या डझनभर महिलांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांनी भरदिवसा नग्न अवस्थेत बाल्कनीत येऊन फोटोशूट केला आहे. दरम्यान समोरच्या इमारतीत राहणाऱ्या एका व्यक्तीने या घटनेचा व्हिडीओ (Viral Video) शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित महिलांवर कारवाई करण्यात आली असून सार्वजानिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डजनभर महिला अशा पद्धतीनं बाल्कनीत येऊन उभ्या राहिल्याने सोशल मीडियात हा व्हिडीओ चर्चेचा विषय ठरत आहे.
इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हिडीओ दुबईतील एका इमारतीतील आहे. संबंधित महिलांनी इस्त्रायल देशाच्या एका वेब साइटच्या प्रसिद्धीसाठी नग्न अवस्थेत फोटोशूट केला आहे. या घटनेची माहिती सोशल मीडियावर पसरल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. खरंतर अशा बाबतीत संयुक्त अरब अमिराती देशाचे कायदे खूपच कडक आहेत. या देशात उघड्यावर किस करण्यासही बंदी आहे. उघड्यावर किस केल्यास कठोर कारवाईची तरतूद यूएईच्या कायद्यांत आहे. अशी एकंदरित परिस्थिती असताना संबंधित महिलांनी नग्न अवस्थेत फोटोशूट केल्याने त्यांच्या अडचणींत वाढ झाली आहे.
(हे वाचा-दारूड्या पतीने घरालाच लावली आग; पत्नी आणि मुलांसह सहा जणांचा होरपळून मृत्यू)
स्थानिक प्रशासनाने त्यांच्यावर कारवाई करत संबंधित महिला गटाला ताब्यात (Women arrested for standing naked in balcony) घेतलं आहे. संयुक्त अरब अमीरातीच्या पब्लिक डीसेंसी लॉचं उल्लंघन केल्यामुळे त्यांना जवळपास 1 हजार युरोचा दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच सहा महिने तुरुंगवासाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे. रत्यावर दारू पिणे, अश्लील वर्तन करणे, किस करणे त्याचबरोबर सोशल मीडियावर अश्लील व्हिडीओ शेअर करणे, अशा विविध कृत्यांसाठी संयुक्त अरब अमीरातीमध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. याठिकाणी सोशल मीडियासोबतच अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर विविध प्रकराचे निर्बंध आहे. अशात संबंधित व्हिडीओ व्हायरल झाल्याने स्थानिक प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहे.
(हे वाचा - शमीच्या पत्नीनं पोस्ट केला BOLD VIDEO, नेटिझन्स म्हणाले पती आणि मुलीचा तरी विचार कर)
संबंधित अश्लील व्हिडीओबाबत माहिती देताना दुबई पोलिसांनी सांगितलं की, 'अटक केलेल्या लोकांना सरकारी वकील देण्यात आला आहे. अशाप्रकारे अश्लील वर्तन करून त्यांनी सामाजिक मुल्यांना कलंक फासला आहे. असं कृत्य आमच्या देशातील समाजात अस्वीकार्य आहे.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bold photoshoot, Crime, Dubai, UAE