• Home
 • »
 • News
 • »
 • crime
 • »
 • दारूड्या पतीने घरालाच लावली आग; पत्नी आणि मुलासह सहा जणांचा होरपळून मृत्यू

दारूड्या पतीने घरालाच लावली आग; पत्नी आणि मुलासह सहा जणांचा होरपळून मृत्यू

या घटनेत व्यक्तीच्या चार मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आणखी चार जणं जळाले आहेत.

 • Share this:
  कर्नाटक, 4 एप्रिल : कर्नाटकमधील कोडागु जिल्ह्यात एका दारूड्याने घरात आग लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत व्यक्तीच्या चार मुलांसह सहा जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय आणखी चार जणं जळाले आहेत. मृतांमध्ये आरोपीची पत्नी आणि मुलाचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना विराजपेत तालुक्यातील मुगुतागेरी गावातील असल्याचं सांगितलं जात आहे. दारूच्या व्यसनामुळे पती-पत्नीमध्ये दूरावा मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी 50 वर्षांचा असून त्याचं नाव येरवरा भोजा असल्याचं सांगितलं जात आहे. भोजाला दारूचं व्यसन होतं. यातून दररोज होणाऱ्या वादातून पत्नी पतीचं घर सोडून भावाकडे राहायला गेली होती. दारू प्यायल्यानंतर पती पत्नीला मारहाण करीत असे. यामुळे वैतागून पत्नी आपल्या भावाकडे निघून गेली होती. पत्नी गेल्यानंतर आरोपीला खूप राग आला. त्याने अनेकदा पत्नीला घरी येण्यास सांगितलं, मात्र तिने ऐकलं नाही. शुक्रवारी दारूच्या नशेत आरोपी पत्नीच्या भावाच्या घरी तिला नेण्यासाठी गेला. घरात सर्वजण झोपलेले पाहून त्याने बाहेरून टाळं लावलं. हे ही वाचा-गर्लफ्रेंडने नशेत असलेल्या बॉयफ्रेंडचा Private Part कापून टॉयलेटमध्ये केला फ्लश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने घराबाहेर टाळं लावलं आणि छतावर चढला. यानंतर तेथील कौल हटवू लागला. त्या रिकाम्या जागेतून त्याने पेट्रोल टाकलं आणि आग लावली. पाहता पाहता आगीच्या ज्वाला दिसू लागल्या आणि बाहेरून टाळं लावलं असल्याने लोक मदतीसाठी ओरडत होते. आरोपीची पत्नी आणि मुलंदेखील घरात होते. पाहता पाहता ते आगीच्या जाळ्यात अडकले व यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत कळताच आरोपीच्या पत्नीचा भाऊ घटनास्थळी आला व तो घरात अडकलेल्यांची मदत करू लागला. या प्रकरणात घरातील केवळ 4 जणांचा वाचविण्यात यश आले असून आरोपीची पत्नी आणि मुलाचा मृत्यू झाला आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: