नवी दिल्ली, 15 मे : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची पत्नी सोशल मीडियावर सक्रीय असते. हसीन जहाँ तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बोल्ड व्हिडिओ पोस्ट करत असल्यानं शमीच्या चाहत्यांनी तिला ट्रोल केलं आहे. गुरुवारी तिनं एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअऱ केला असून यामुळे शमीचे चाहत्यांनी तिला किमान शमीचा आणि पतीचा तरी विचार कर असं सुनावलं आहे.
हसीन जहाँने तिच्या मॉडेलिंग शूटचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात तिनं हिरव्या रंगाचा ड्रेस घातला आहे. हसिन जहाँ यामध्ये बोल्ड अवतारात दिसते. हसिन जहाँने व्हिडिओ पोस्ट करताना एक कॅप्शनही दिला आहे. यात म्हटलं की, 'सवाल करूं बार-बार कैसे जियूं, नजाकते जिंदगी बोली जैसे दिल चाहे वैसे जियो. खुशी ही तुम्हारी इबादत है खुश रहोगे तो दोनों जहां तुम्हारी है.'
कॅप्शनमधून हसीन जहाँनं तिला ट्रोल करणाऱ्यांसाठीच लिहिला आहे. तिच्या फोटो, व्हिडिओवर लोक तिला ट्रोल करण्यासाठी कमेंट करत असतात. तिच्या या व्हिडिओवरही अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत. एका युजरनं म्हटलं की, किमान मोहम्मद शमी आणि मुलीचा तरी विचार कर.
हे वाचा : लेकीसाठी कायपण! लॉकडाऊनमध्ये नाराज झालेल्या मुलीसाठी बापानं काय केलं पाहा
हसीन जहाँ आणि मोहम्मद शमी आता वेगवेगळे राहतात. 2018 मध्ये दोघात भांडण झालं होतं. तेव्हा हसीन जहाँने शमीवर घरगुती हिंसाचाराचा आणि मॅच फिक्सिंगचा आरोप केला होता. बीसीसीआय़ने शमीला मॅच फिक्सिंगच्या आरोपातून क्लीन चीट दिली आहे.
हे वाचा : लॉकडाऊनमध्ये रविना टंडनचा बोल्ड अंदाज, सोशल मीडियावर 'बिकिनी' PHOTO व्हायरल