कीव, 9 मे : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia Ukraine War) सुरू होऊन दोन महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. यातच आता आणखी एक वेगळी बातमी समोर आली आहे. यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelensky) यांनी लंडनमध्ये एका चॅरिटी लिलावात आपल्या खूप प्रसिद्ध अशा खाकी टी शर्टचा लिलाव केला आहे. 85 लाख 43 हजार 505 रुपयांमध्ये या टी शर्टचा लिलाव झाला. हा कार्यक्रम यूक्रेन दुतावास द्वारा टेट मॉडर्न येथे 6 मे यादिवशी आयोजित करण्यात आला होता. टी-शर्टची सुरुवातीची किंमत £50,000 ठेवण्यात आली होती. यानंतर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी खरेदीदारांना जास्त बोली लावण्याचे आवाहन केले.
यूक्रेनचे राष्ट्रपती वोलोडिमिर जेलेन्स्की यांचे संबोधन -
लिलावाच्या आधी वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी या कार्यक्रमाला व्हर्चुअल स्वरुपात संबोधितही केले. त्यांनी ब्रिटेन आणि आणि ब्रिटेनचे प्रमुख बोरिस जॉन्सन यांच्या समर्थनासाठी स्तुती केली. ते पुढे म्हणाले की, रशियन सैन्याने रुग्णालये आणि प्रसूती रुग्णालयांसह सुमारे 400 आरोग्य सुविधा नष्ट केल्या आहेत. तर यासोबतच रशियाने युक्रेन आणि युरोपसमोर उभ्या केलेल्या समस्यांवर त्यांनी प्रकाश टाकला. टेट मॉडर्नने “युक्रेनशी एकजुटीचे विधान” तपशीलवार अधिकृत प्रेस रिलीज देखील जारी केले. यानुसार, टेट युक्रेनच्या लोकांसोबत एकजुटीने उभे आहेत आणि रशियन आक्रमणाचा निषेध करत आहेत. जगभरातील इतर संग्रहालये आणि कला संस्थांसह, आम्ही रशियाला युक्रेनमधून ताबडतोब माघार घेण्याच्या जागतिक मोहिमेला पाठिंबा देतो आणि आम्ही रशियन सरकारशी संबंधित कोणाशीही काम करणार नाही किंवा संबंध ठेवणार नाही." यापूर्वी, आर्थिक समालोचक पीटर शिफ यांनी झेलेन्स्की यांनी टी-शर्ट घालून यूएस काँग्रेसला संबोधित केल्याबद्दल तक्रार केली होती. झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांना रशियाविरुद्ध आणखी निर्बंध लादण्याची आणि युक्रेनवर नो-फ्लाय झोन स्थापन करण्याची विनंती केली होती, असे वृत्त न्यूजवीकने दिले आहे. हेही वाचा - युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले होते रशियन फौजेच्या तावडीतून, अंगावर शहारे आणणारा प्रसंग
कॉंग्रेसच्या सदस्यांनी झेलेन्स्कीच्या भावनिक आवाहनाला स्थायी ओव्हेशन दिले, परंतु शिफ यांनी ट्विटरवर असंवेदनशील टिप्पणी करत लिहिले की, ‘मला समजते की काळ कठीण आहे, परंतु युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांना सूट नाही का? यूएस काँग्रेसच्या सध्याच्या सदस्यांबद्दल मला तेवढा आदरही नाही. मी अजूनही त्यांना टी-शर्ट घालून संबोधत नाही करणार. मी संस्थेचा किंवा युनायटेड स्टेट्सचा अनादर करू इच्छित नाही.’