मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

मानवी शरीरावर आधीपासूनच आहे अगणित फंगसचं वास्तव्य, आढळतात 80 प्रकारच्या बुरशी

मानवी शरीरावर आधीपासूनच आहे अगणित फंगसचं वास्तव्य, आढळतात 80 प्रकारच्या बुरशी

फंगस (Fungus) अर्थात बुरशीसारखे सूक्ष्मजीव आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असतात. शिवाय मानवी शरीरावरही वेगवेगळ्या प्रकारची बुरशी वास्तव्याला असते, हे फार थोड्या जणांना माहिती असतं.

फंगस (Fungus) अर्थात बुरशीसारखे सूक्ष्मजीव आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असतात. शिवाय मानवी शरीरावरही वेगवेगळ्या प्रकारची बुरशी वास्तव्याला असते, हे फार थोड्या जणांना माहिती असतं.

फंगस (Fungus) अर्थात बुरशीसारखे सूक्ष्मजीव आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असतात. शिवाय मानवी शरीरावरही वेगवेगळ्या प्रकारची बुरशी वास्तव्याला असते, हे फार थोड्या जणांना माहिती असतं.

नवी दिल्ली, 27 मे: भारतात कोविड-19च्या (Covid19) भयंकर साथीने हाहाकार माजवला आहे. त्यातच आता ब्लॅक फंगस (Black Fungus) अर्थात काळ्या बुरशीमुळे होणाऱ्या म्युकरमायकॉसिसने (Mucormycosis) थैमान घातलं आहे. त्यामुळे एकापाठोपाठ एक देशातल्या अनेक राज्यं या आजाराला महामारी म्हणून घोषित करत आहेत. फंगस (Fungus) अर्थात बुरशीसारखे सूक्ष्मजीव आपल्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणावर अस्तित्वात असतात. शिवाय मानवी शरीरावरही रातही वेगवेगळ्या प्रकारची बुरशी वास्तव्याला असते, हे फार थोड्या जणांना माहिती असतं.

मनुष्यप्राणी पहिल्यापासूनच अनेक प्रकारच्या बुरशीच्या संसर्गाशी लढत आला आहे. अॅथलीट फूट, रिंगवर्म, डायपर रॅश, केसांतला कोंडा, व्हजायनल यीस्ट इन्फेक्शन (Vaginal Yeast Infection) हे सगळे प्रकार बुरशीमुळे होतात. बुरशी हा सूक्ष्मजीव असून, तो केवळ सूक्ष्मदर्शक यंत्राद्वारेच पाहता येतो. हवा, पाणी यांसह मानवी शरीरातही वेगवेगळ्या प्रकारची बुरशी मोठ्या प्रमाणावर असते.

हे वाचा-कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारचा नवा निर्णय, वाचा सविस्तर

शरीरातील 14 जागांवरून घेतले नमुने

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अर्थात NIH च्या शास्त्रज्ञांनी आपल्या शरीरातल्या बुरशीच्या प्रकारांची गणना केली आहे. मानवी शरीरात असलेल्या बुरशींमध्ये विविधता आहे. या संशोधनामध्ये 10 व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. त्यात शास्त्रज्ञांनी या व्यक्तींच्या डोक्यापासून पायांपर्यंतच्या 14 जागांवरून नमुने घेतले आणि त्यांचं डीएनए विश्लेषण केलं. त्यातून बुरशीचं अस्तित्व कुठे असतं, याचा छडा त्यांनी लावला. डोक्याच्या पाठीमागचा भाग, नाक, पाय, जांघा आदी भागांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं. कारण या ठिकाणी बुरशीचा संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते.

हे वाचा-Black Fungusच्या रुग्णांना दिलासा, भारतात Zydus Cadila आणि TLC उपलब्ध करणार औषध

80 प्रकारच्या बुरशी

डीएनए सिक्वेन्सिंगवरून (DNA Sequencing) शास्त्रज्ञांना हे लक्षात आलं, की 80 प्रकारच्या बुरशी मानवी शरीराच्या पृष्ठभागावर आढळतात. मॅलासीजिया वंशातल्या बुरशीची संख्या सर्वांत जास्त असल्याचं आढळून आलं. ही बुरशी डोकं आणि धडावर आढळते. आपल्या हातांवर बॅक्टेरिया अर्थात जिवाणू मोठ्या प्रमाणावर असतात. तिथे बुरशीची संख्या कमी असते; पण पायाची खोट, पायांच्या बोटांमधली चामडी, पायाची नखं आदींमध्ये बुरशीचे विविध प्रकार पाहायला मिळाले. त्यात सॅकरोमायसिस नावाच्या बुरशीचाही समावेश असतो. या बुरशीचा वापर बियर किंवा ब्रेड तयार करण्यासाठी केला जातो.

मानवी शरीरात 80 प्रकारच्या बुरशी आढळून येतात (Photo- shutterstock)

मानवी शरीरात 80 प्रकारच्या बुरशी आढळून येतात (Photo- shutterstock)

पायांच्या अंगठ्यांच्या नखांवरचा बुरशीचा संसर्ग हटवणं कठीण असतं. शास्त्रज्ञांना असं आढळलं, की पायाच्या नखांमध्ये एका वेगळ्याच प्रकारच्या बुरशीचा समूह आढळतो. त्यापैकी काही बुरशी नखाचा मूळ रंग उडवतात, काही बुरशी नखांना क्षती पोहोचवतात, तर काही बुरशी रोगकारक जिवाणू आणि बुरशीचा प्रवेश सुकर करतात.

का महत्त्वाचा आहे हा अभ्यास?

या अभ्यासातून शास्त्रज्ञांच्या असं लक्षात आलं, की त्वचा हे खूपच जटिल आणि गुंतागुंतीचं ठिकाण आहे. तिथे बॅक्टेरिया (Bacteria), व्हायरस (Virus) आणि फंगस (Fungus) अर्थात जिवाणू, विषाणू आणि बुरशी यांचं एकमेकांशी वेगळंच नातं तयार होतं. या सूक्ष्मजीवांचं नेटवर्क कसं काम करतं आणि ते मानवासाठी काय करतात, याचा छडा शास्त्रज्ञांना या शोधातून लागला. काही सूक्ष्मजीव त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतात, तर काही सूक्ष्मजीव रोग पसरवतात.

बुरशी माणसाची त्वचा आणि नखांना सर्वाधिक धोका पोहोचवते (प्रतिकात्मक फोटो- shutterstock)

बुरशी माणसाची त्वचा आणि नखांना सर्वाधिक धोका पोहोचवते (प्रतिकात्मक फोटो- shutterstock)

शरीराच्या त्वचेचे (Skin) अनेक भाग म्हणजे बुरशीची वास्तव्यस्थानं आहेत. एनआयएचच्या सहयोगाने गेल्या वर्षी झालेल्या एका संशोधनात असं लक्षात आलं होतं, की मानवी आतड्यांमध्ये बॅक्टेरियासोबतच बुरशीही मोठ्या प्रमाणावर उपस्थित असते. अमेरिकेत जवळपास तीन कोटी जणांना बुरशीजन्य संसर्ग झालेला असतो. त्यापैकी बऱ्याचशा व्यक्तींना त्वचेच्या संदर्भातला संसर्ग असतो; पण फुप्फुसांमधला प्राणघातक संसर्ग, मेंदूज्वर आदी संसर्गांचाही त्यात समावेश असतो.

तोंडातल्या संसर्गावरच्या काही औषधांचे असे काही साइड इफेक्ट्स आहेत, की ज्यामुळे मूत्रपिंडंही खराब होऊ शकतात. बुरशीजन्य संसर्गावर योग्य उपचार होण्यासाठी त्यांच्याविषयीची योग्य माहिती असणं गरजेचं असतं. या सूक्ष्मजीवांचं जीनोम सिक्वेन्सिंग केलं जात असून, त्यामुळे आरोग्य क्षेत्राचा एक नवा आयाम खुला होणार आहे.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Health