मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हवेतून पसरणाऱ्या कोरोनापासून बचावासाठी किती हवं सोशल डिस्टन्सिंग?

हवेतून पसरणाऱ्या कोरोनापासून बचावासाठी किती हवं सोशल डिस्टन्सिंग?

हवेमार्फत कोरोना 10 मीटरपर्यंत जाऊ शकतो (Coronavirus spread through air), असं सरकारनंही सांगितलं आहे.

हवेमार्फत कोरोना 10 मीटरपर्यंत जाऊ शकतो (Coronavirus spread through air), असं सरकारनंही सांगितलं आहे.

हवेमार्फत कोरोना 10 मीटरपर्यंत जाऊ शकतो (Coronavirus spread through air), असं सरकारनंही सांगितलं आहे.

मुंबई, 27 मे : कोरोना विषाणू हवेतून (Airborne corona) पसरत असल्याचं सांगत केंद्र सरकारने कोरोना प्रोटोकॉलमध्येही बदल केले आहेत. लँसेट नियतकालिकातल्या लेखातून शास्त्रज्ञांनी हा विषाणू हवेतून पसरत (Corona spread through air) असण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. तसंच हा विषाणू एअरबोर्न असल्याचं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) या संस्थेनेही स्पष्ट केलं. त्यामुळे एकमेकांच्या थेट संपर्कात किंवा कोरोना विषाणूच्या संपर्कात अगदी जवळून न आल्यासही हवेत असलेल्या विषाणूमार्फतही कोरोना संक्रमण होऊ शकतो. त्यामुळे आता हवेतून पसरणाऱ्या कोरोनापासून बचाव करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग (Social Distancing) किती राखावं असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

आतापर्यंत कोरोना हा ड्रॉपलेटमार्फत पसरत असल्याने दोन मीटरचं सोशल डिस्टन्सिंग पुरेसं होतं. पण आता तो एरोसोलच्या रूपात (aerosol) हवेतून 10 मीटरपर्यंत जाऊ शकतो, असं सांगितलं जातं आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगही किती ठेवावं याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेशी बोलताना इंडियन स्पायनल इंज्युरीज सेंटरचे मेडिकल डायरेक्टर एच. एस. छाब्रा यांनी सांगितलं, "दोन मीटरचं सोशल डिस्टन्सिंग पुरेसं नाही. कारण विषाणू एअरोसोलद्वारे पसरत असल्यानेच इतक्या वेगाने त्याचा प्रसार होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे कोविडच्या अनुषंगाने आपल्या वर्तणुकीत योग्य ते बदल करणं सर्वांत महत्त्वाचं आहे"

"हा विषाणू हवेत सहा तासांपर्यंत जिवंत राहू शकतो आणि 10 मीटर अंतरापर्यंत प्रवास करू शकतो. त्यामुळे डबल मास्क घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. डबल मास्क (Double Mask) असेल, तर दोन मीटरचं अंतर पुरेसं आहे", असं शालिमार बागमधल्या फोर्टिस हॉस्पिटलमधले पल्मोनॉलॉजी विभागाचे प्रमुख विकास मौर्य यांनी सांगितलं.

हे वाचा - Cocktail Drug घेणाऱ्या पहिल्या कोरोना रुग्णाचा रिपोर्ट; पाहा कसं काम करतंय औषध

केंद्र सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजयराघवन (Pro. K. Vijayaraghavan) यांनी काही मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. त्यात मास्क, सोशल डिस्टन्सिंग, स्वच्छता याबरोबरच व्हेंटिलेशन अर्थात हवा खेळती राहण्याचं महत्त्वही विशद केलं आहे. बंदिस्त खोल्या, ऑफिसेस इत्यादींमध्ये हवेत नकळतपणे संसर्ग पसरला असेल, तर तो कमी करण्यासाठी हवा खेळती राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे लक्षणं दिसत नसलेल्या व्यक्तीकडून घरातल्या अन्य व्यक्तीला लागण होण्याचा धोका कमी होऊ शकतो. घरात एखादा दुर्गंध पसरला असल्यास तो कमी करण्यासाठी ज्याप्रमाणे खेळत्या हवेचा उपयोग होतो, तसाच व्हायरल लोड कमी करण्यासाठीही त्याचा उपयोग होतो.

अलिकडे लोक एसीवर (Air Conditioner) मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहू लागले आहेत. बहुतांश मॉडर्न इमारतींमध्ये असलेल्या एसीमध्ये 90 टक्के आतलीच हवा आत पुन्हा फिरवली जाते. केवळ पाच टक्केच नवी हवा आत येते.

याबद्दल मुंबईच्या आयएमके आर्किटेक्ट्सचे प्रमुख आर्किटेक्ट राहुल काद्री म्हणतात, "एसीमुळे खोली किंवा संबंधित इमारतीत अंतर्गत संसर्ग पसरण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे हॉस्पिटल्समध्ये जिथं शक्य असेल तिथं खिडक्या उघड्या ठेवून नैसर्गिक हवा आत येऊ द्यावी. स्टराइल झोन्समध्ये एअर कंडिशनिंग यंत्रणा अपग्रेड करून त्यात तीन टप्प्यांची फिल्टरेशन यंत्रणा बसवायला हवी. त्यात अल्ट्रा-व्हायोलेट ट्रीटमेंटही देता येईल, जेणेकरून आतली दूषित हवा काढून टाकता येईल."

छोट्या घरांत किंवा दाटीवाटीच्या भागात राहणाऱ्या व्यक्तींनी घरातही कायम मास्क घालावा. तसंच घरांना एक्झॉस्टफॅन्स बसवावेत, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

हे वाचा - Alert! हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी सरकारने जारी केला नवा कोविड प्रोटोकॉल

व्हेंटिलेशन (Ventlation) नसताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, ऑफिसेस, मॉल्स उघडले गेले, तर संसर्ग पसरण्याचा धोका मोठा आहे. 'एसीबसेस, मेट्रो यामध्ये हवेचा प्रवाह सुधारण्यासाठी एक्झॉस्ट यंत्रणा बसवणं, जिथं शक्य असेल तिथं एसी सिस्टीममध्ये हेपा फिल्टर्स बसवणं, ते वेळोवेळी साफ करणं आणि बदलणं महत्त्वाचं आहे. मॉल्स आणि मोठ्या ऑफिसेसमध्ये रूफ व्हेंटिलेटर्स, हेफा फिल्टर्स उपयुक्त ठरू शकतात", असं छाब्रा यांनी सांगितलं.

"एअरोसोलच्या माध्यमातून पसरत असलेला विषाणू तीन-चार तासांपर्यंतही हवेत राहू शकतो. त्यामुळे या सगळ्या प्रतिबंधात्मक गोष्टी जिकिरीच्या असल्या, तरी करायला हव्यात", असं त्यांनी सांगितलं. डबल मास्क, हातांची स्वच्छता, दरवाज्यांची हँडल्स, स्विचेस, टेबल-खुर्च्या, फरशी आदींची स्वच्छता यावर भर देण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली.

First published:

Tags: Corona, Coronavirus, Covid-19, Covid19