रोम, 25 मार्च : इटलीमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. इटलीमधील परिस्थितीत दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. मंगळवारी इटलीमध्ये (Italy) कोरोनाव्हायरसमुळे (Coronavirus) तब्बल 743 लोकांचा मृत्यू झाला. इटलीमध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर मंगळवार दुसरा असा दिवस आहे जिथे मृत्यूची संख्या सर्वाधिक होती. तर, जगभरात कोरोनामुळे 16 हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 175 देशांमध्ये 3 लाख 86 हजार 350 हून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे.
इटलीमध्ये प्रत्येक मिनिटाला एका माणसाचा मृत्यू होत आहे. या सगळ्यात सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या व्हायरल फोटोमध्ये शेकडो मृतहेद जमिनीवर पडलेले दिसत आहे. हा फोटो इटलीचा असल्याचा दावा करत सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. मात्र Fact Checkमध्ये हा फोटो खोटा असल्याचे समोर आले आहे. याआधी याच फोटोला चीनच्या नावाने व्हायरल करण्यात आले आहे.
वाचा-...तर मेपर्यंत भारतात 13 लाख लोकांना होणार कोरोना, शास्त्रज्ञांनी दिला इशारावाचा-इटलीमध्ये कोरोनामुळे 743 जणांच्या मृत्यूचा रेकॉर्ड, जगातील 2.6 अब्ज लोक लॉकडाऊनकाय आहे सत्य?
हा फोटो शेअर करताना य़ुझर, दोस्तांनो इटलीमध्ये लोकांची अशी अवस्था झाली आहे. त्यांना उचलण्यासाठीही कोणी नाही आहे, असे कॅप्शन देत आहेत. हाच फोटो काही दिवसांआधी चीनच्या नावाने शेअर करण्यात आला होता. त्यावेळी सॅलेटाईटमधून चीनमधील भयावह स्थिती टिपण्यात आली आहे, असे सांगण्यात आले होते. मात्र हा फोटो खरतर 2014चा आहे. हा फोटो जर्मनीमधील फ्रँकफर्ट येथील आहे. 24 मार्च 2014 मध्ये घेण्यात आलेला हा फोटो एका आर्ट प्रोजेक्टचा भाग होता. नाझींच्या छळछावणीत मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक अशा पद्दतीने रस्त्यावर झोपले होते. 1945मध्ये हिटलरने नाझी कॅम्पमध्ये 528 ज्यू नागरिकांना ठार केलं होतं. त्यांना फ्रँकफर्टमध्ये दफण करण्यात आले होते. त्यामुळं त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी हा फोटो काढण्यात आला होता. मात्र हा फोटो आता पुन्हा कोरोनामुळं व्हायरल केला जात आहे.
Published by:Priyanka Gawde
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.