देशातील बाजारपेठेवर कोरोनाचा सर्वात मोठा फटका, सोन्याची विक्री गाठणार 25 वर्षातील निच्चांक

देशातील बाजारपेठेवर कोरोनाचा सर्वात मोठा फटका, सोन्याची विक्री गाठणार 25 वर्षातील निच्चांक

कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशातील सोन्याची विक्री 25 वर्षातील सर्वात कमी स्तरावर घसरू शकते.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 मार्च : कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे देशातील सोन्याची विक्री 25 वर्षातील सर्वात कमी स्तरावर घसरू शकते. या वर्षी सोन्याची विक्री 30 टक्क्यांनी घटण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याची किंमती वाढल्या आहेत. त्यातच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जगातील अनेक देशांमध्ये लॉक डाऊन आहे. भारतातील बाजारपेठाही बंद आहेत. या सगळ्या बाबींचा सोन्याच्या विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपी ग्रोथ सुद्धा 11 वर्षातील सर्वात खालच्या स्तरावर राहण्याची शक्यता आहे.

(हे वाचा- कोरोनाच्या संकटकाळात या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा, मिळणार पूर्ण पगार)

ब्लूमबर्ग मीडिया अहवालानुसार ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक काउन्सिलचे चेअरमन अनंत पद्मनाभन यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्यावर्षी भारतात 690 टन सोन्याची विक्री झाली होती. दरम्यान या आकड्यामध्ये 30 टक्के घट होऊन यावर्षी विक्री होण्याची शक्यता आहे. म्हणजेच यावर्षी 483 टनच सोन्याची विक्री होण्याची शक्यता आहे. 1985 मध्ये सर्वात कमी सर्वात कमी म्हणजे 485 टन सोन्याची विक्री झाली होती. त्यानंतर 25 वर्षानंतर एवढी कमी विक्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

(हे वाचा-बचत खात्यासंदर्भातील हा महत्त्वाचा नियम बदलला, आता राहा टेन्शन फ्री)

आपण आता वर्षभरातील विक्रीबद्दल भाष्य केलं, मात्र येणाऱ्या काही काळात सोन्याची मागणी 40 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे देशातील प्रमुख शॉपिंग मॉल्स बंद आहेत. देशातील सर्वात मोठे ज्वेलर्स टायटन यांनी सुद्धा 29 मार्चपर्यंत त्यांचे स्टोर्स आणि मॅन्युफॅक्चरिंग बंद केले आहे. त्यानंतर सुद्धा एकंदरित परिस्थिती पाहता निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबईतील सर्वात मोठे मार्केट असणारं झवेरी बाजार सुद्धा पुढील नोटीस येईपर्यंत बंद आहे. इंडिया बुलियन अँँड ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी यांच्या मते सोन्याची मागणी 40 टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे.

First published: March 25, 2020, 11:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading