Home /News /videsh /

मासे आणि चिप्स विक्रेत्यांना पोलिसांकडून Alert, घडतायत विचित्र गुन्हे

मासे आणि चिप्स विक्रेत्यांना पोलिसांकडून Alert, घडतायत विचित्र गुन्हे

मासे आणि चिप्स यांची विक्री करणाऱ्या दुकानदारांनी शटर नीट बंद करावेत आणि सुरक्षा वाढवावी, असे आदेश पोलिसांनी दिले आहेत. याचं कारण मोठं विचित्र आहे.

    नॉर्थ वेल्स, 17 जानेवारी: शहरातील मासे आणि चिप्स (Fish and Chips) या पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांना (Shopkeeper) स्थानिक पोलिसांनी (Local Police) सावध राहण्याची सूचना दिली आहे. या दुकानांमध्ये वापरण्यात येणाऱ्या खाद्यतेलाची चोरी (Theft of cooking oil) होण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत वाढ झाली असून अशा चोऱ्यांपासून सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? नॉर्थ वेल्समध्ये गेल्या काही दिवसांपासून वापरलेलं खाद्यतेल चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. ज्या ज्या दुकानांमध्ये पदार्थ तळण्यासाठी तेल वापरलं जातं, त्या दुकानांचा चोरटे लक्ष्य करत आहेत. वापरलेलं खाद्यतेल चोरून त्याचा वापर बायोडिझेल बनवण्यासाठी केला जातो. हे बायोडिझेल ब्लॅक मार्केटमध्ये विकून पैसे कमावण्याचा गोरखधंदा गेल्या काही महिन्यांपासून वाढीस लागला आहे. यासाठी मासे तळणाऱ्या, चिप्स तळणाऱ्या किंवा इतर कुठलेही पदार्थ तळण्यासाठी तेलाचा वापर करणाऱ्या दुकानदार, हॉटेल्स आणि इतर आस्थापनांना पोलिसांनी सावध राहण्याची सूचना केली आहे.  बायोडिझेलचा काळाबाजार नॉर्थ वेल्समध्ये जेवढं खाद्यतेल तयार होऊन बाजारात येतं, त्याच्या एक पंचमांश तेलाची आतापर्यंत चोरी झाल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेकदा तळलेल्या तेलाचा पुनर्वापर केला जात नाही. असं तेल दुकानदार उघड्यावर ठेऊन निघून जातात. बऱ्याचदा डब्यात भरून हे तेल इतर वापरासाठी ठेवण्यात येतं, मात्र ते पूर्णतः सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात येत नाही. याचाच फायदा चोरटे घेतात आणि रात्रीच्या वेळी दुकानांचे शटर उचकटून ते लंपास करत असल्याचं चित्र आहे.  हे वाचा - प्रकार आहे जुनाच नॉर्थ वेल्समध्ये हा प्रकार जुनाच असला तरी पूर्वी किरकोळ आणि तुरळक चोऱ्या होत असत. गेल्या काही आठवड्यांपासून मात्र हा ट्रेंड बनत असून याला गंभीर गुन्ह्याचं स्वरूप येऊ लागलं आहे. पोलिसांसाठी ही चिंतेची बाब बनली आहे. 
    Published by:desk news
    First published:

    Tags: Crime, Petrol and diesel, Police, Theft

    पुढील बातम्या