• Home
 • »
 • News
 • »
 • videsh
 • »
 • आज पहिल्यांदा होणार PM Modi आणि जो बायडेन यांची प्रत्यक्ष भेट, या मुद्द्यांवर करणार चर्चा

आज पहिल्यांदा होणार PM Modi आणि जो बायडेन यांची प्रत्यक्ष भेट, या मुद्द्यांवर करणार चर्चा

पंतप्रधान मोदी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची भेट घेणार आहेत.

 • Share this:
  वॉश्गिंटन, 24 सप्टेंबर: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांची भेट घेणार आहेत. पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांची ही पहिली प्रत्यक्ष भेट असेल. याआधी दोघांची एकमेकांसोबत फोनवर अनेकदा चर्चा झाली आहे. पीएम मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या या बैठकीत दहशतवादासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय पंतप्रधान क्वाड (Quad) देशांच्या वैयक्तिक बैठकांमध्ये देखील सहभागी होतील. तीन वेळा झाली Virtual Meeting राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर जो बायडेन (Joe Biden पहिल्यांदा पंतप्रधान मोदींची (PM Modi)भेट घेणार आहेत. दरम्यान तीन वेळा दोघांमध्ये Virtual Meeting झाल्या आहेत. मार्चमध्ये क्वाड शिखर परिषद, एप्रिलमध्ये हवामान बदल शिखर परिषद आणि जूनमध्ये जी -7 शिखर परिषदेत दोन्ही नेत्यांनी Virtually भाग घेतला होता. नोव्हेंबर 2020 मध्ये, जेव्हा बायडेन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आले, तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये फोनवर चर्चा झाली. T20 वर्ल्ड कपची BCCI ला काळजी, IPL टीम्सना पत्र लिहून केली 'हे' आवाहन  या मुद्द्यांवर चर्चा व्हाईट हाऊसमध्ये होणाऱ्या पंतप्रधान मोदी-जो बायडेन यांच्या पहिल्या बैठकीत संरक्षण, परस्पर संबंध, भारतीयांचा व्हिसा आणि व्यापार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुत्सद्दीपणा (Diplomacy) आणि संरक्षण या दोन्ही दृष्टीने ही सर्वात महत्वाची बैठक मानली जाते. या दरम्यान दहशतवादाबरोबरच अफगाणिस्तानच्या मुद्द्यावरही चर्चा होऊ शकते. मोदींनी घेतली उपराष्ट्राध्यक्षांची भेट पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस (Vice President Kamala Harris)यांची भेट घेतली. भारतीय वंशाच्या अमेरिकन उपराष्ट्राध्यक्षांनी भारतीय पंतप्रधानांचे स्वागत करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची प्रत्यक्ष भेटण्याची ही पहिलीच वेळ आहे. व्हाईट हाऊसमध्ये (White House) झालेल्या या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी हॅरिस यांना भारतात येण्याचं आमंत्रण दिलं आहे. Alert! टिफिन बॉक्समध्ये IED ठेऊन होऊ शकतो दहशतवादी हल्ला उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांनी पंतप्रधानांचे स्वागत करून आनंद झाल्याचं म्हटलं आहे. हॅरिस म्हणाल्या की, भारताच्या पंतप्रधानांचे स्वागत करुन मला खूप आनंद झाला आहे. त्याचवेळी या संभाषणात, पीएम मोदींनी कमला हॅरिस यांचं खूप कौतुक केलं. पीएम मोदी म्हणाले की, कमला हॅरिस संपूर्ण जगासाठी एक प्रेरणा आहे. मोदी म्हणाले की, जर तुम्ही भारत (India)दौऱ्यावर आलात तर संपूर्ण देश खूप आनंदी होईल.
  Published by:Pooja Vichare
  First published: