मराठी बातम्या /बातम्या /देश /

टिफिन बॉक्समध्ये IED ठेऊन दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, गुप्तचर यंत्रणेकडून भारताला अलर्ट जारी

टिफिन बॉक्समध्ये IED ठेऊन दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता, गुप्तचर यंत्रणेकडून भारताला अलर्ट जारी

पाकिस्तानी गुप्तचर (Pakistani intelligence agency)  संस्था ISI भारतात मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) करण्याच्या तयारीत आहे.

पाकिस्तानी गुप्तचर (Pakistani intelligence agency) संस्था ISI भारतात मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) करण्याच्या तयारीत आहे.

पाकिस्तानी गुप्तचर (Pakistani intelligence agency) संस्था ISI भारतात मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) करण्याच्या तयारीत आहे.

  • Published by:  Pooja Vichare
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर: पाकिस्तानी गुप्तचर (Pakistani intelligence agency) संस्था ISI भारतात मोठा दहशतवादी हल्ला (Terrorist Attack) करण्याच्या तयारीत आहे. देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी धोक्याचा इशारा जारी करत अलर्ट (Alert) जारी केला आहे. टिफिन बॉक्समध्ये (Tiffin Box) IED ठेऊन मोठा हल्ला केला जाण्याची शक्यता असल्याचं संशय गुप्तचर यंत्रणेनं व्यक्त केला आहे, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. देशाला हादरवून टाकण्यासाठी, गर्दीच्या भागात स्फोट करण्याचा प्लान आखला जात असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, सणासुदीचा काळ लक्षात घेऊन हल्ल्याची योजना आखण्यात आली आहे. हा प्लान पूर्ण करण्यासाठी, मोठ्या संख्येनं पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करू शकतात. काही दिवसांपूर्वीच दिल्ली पोलिसांनी पाकिस्तानी टेरर मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. या कारवाईत पोलिसांनी सहा दहशतवाद्यांना अटक केली होती. त्यापैकी दोन दहशतवाद्यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन ट्रेनिंगही घेतलं होतं. पीओकेमध्ये दहशतवादी संघटना पुन्हा सक्रिय अफगाणिस्तानवर तालिबाननं कब्जा मिळावल्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoK) स्थित दहशतवादी छावणीमध्ये खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांचे मास्टरमाईंड दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याच्या प्लान आखत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पीओकेमध्ये तीन नवीन दहशतवादी छावण्या सक्रिय करण्यात आल्या आहेत. ज्यामुळे आता दहशतवादी छावण्यांची संख्या 17 वरून 20 झाली आहे.

घरात घुसून मुलीचं तोंड दाबलं अन् चिरला गळा; साताऱ्यात एकतर्फी प्रेमाचा रक्तरंजित शेवट

 सुरक्षा यंत्रणांशी संबंधित एका अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्यात फेब्रुवारीमध्ये युद्धबंदी झाल्यापासून पाकिस्तानची गुप्तचर संस्था पुन्हा एकदा जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना घुसवण्याच्या कटात गुंतली आहे. 18-19 सप्टेंबरच्या रात्री नियंत्रण रेषेजवळ उरीमध्ये 6 दहशतवाद्यांच्या घुसखोरीची माहिती मिळाल्यानंतर सैन्य गेल्या दोन दिवसांपासून सातत्याने दहशतवाद्यांविरोधात सर्च ऑपरेशनमध्ये व्यस्त आहे. घुसखोरी केलेले दहशतवादी टेरर कॅम्पमधून ट्रेनिंग घेऊन जम्मू काश्मिरमध्ये एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या कटात शिरण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती मिळाली आहे.

''तुम्ही भारत दौऱ्यावर या, देश खूप आनंदी होईल'', पंतप्रधान मोदींकडून कमला हॅरिस यांना भारतात येण्याचं आमंत्रण

 या महिन्याच्या सुरुवातीला ही भारतावर दहशतवादी हल्ल्याचं सावट असल्याचं गुप्तचर यंत्रणांनी म्हटलं होतं. गुप्तचर संस्थेनं जारी केलेल्या अलर्टनुसार, IS KP या दहशतवादी संघटनेचे प्रशिक्षित दहशतवादी (Terrorist Attack) भारतावर हल्ला करण्याची शक्यता आहे. अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवादी संघटनेच्या उच्च कमांडनं भारतात उपस्थित असलेल्या त्याच्या स्लीपर सेलशी संपर्क साधला आहे. भारतात उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांना IED बनवण्यासाठी आणि लहान शस्त्रे खरेदी करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचं आश्वासन देण्यात आलं असल्याची माहितीही गुप्तचर यंत्रणेनं दिली आहे.
First published:

Tags: Pakistan, Terror attack

पुढील बातम्या