नवी दिल्ली 02 जुलै : दहशतवादाच्या वाटेवर चालता-चालता पाकिस्तानाची (Pakistan) दयनीय अवस्थता कशी झाली आहे हे जगापासून लपलेले नाही. नवीन पाकिस्तान निर्माण करण्याचं आश्वासन देऊन सत्तेवर आलेले इम्रान खानदेखील (Pakistan PM Imran Khan) आता कबूल करतात, की त्यांचा देश कंगाल झाला आहे. इम्रान खान यांनी गुरुवारी अन्नसुरक्षा (Food Security) हे पाकिस्तान पुढचे सर्वात मोठे आव्हान असल्याचे सांगत म्हटलं, की भविष्यात लोकांना अन्नटंचाईपासून वाचविण्यासाठी देशाने पावले उचलण्याची गरज आहे. पाकिस्तानमधील ४० टक्के मुले कुपोषणाला बळी पडल्याचंही त्यांनी म्हटले आहे. डॉनच्या वृत्तानुसार, इस्लामाबाद येथील शेतकरी परिषदेला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की, गेल्या वर्षी पाकिस्तानने 40 दशलक्ष टन गहू आयात केला. याचा परकीय चलन साठ्यावर वाईट परिणाम झाला होता, ज्याची आधीपासूनच कमतरता होती. इम्रान खान म्हणाले की, “पाकिस्तानसमोर एक नवीन आव्हान आहे आणि सर्वात मोठे आव्हान अन्न सुरक्षा आहे.” ते म्हणाले की वेगाने वाढणार्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी तयारी करण्याची गरज आहे. Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या संदर्भातील सर्वात मोठी बातमी क्रिकेटरहून-राजकारणी बनलेल्या इम्रान खान यांनी म्हटलं, की पौष्टिक अन्नाअभावी 40 टक्के मुलांचा शारिरीक तसंच बुद्धीचाही विकास होत नाहीये. ते म्हणाले, “अन्न सुरक्षा ही वास्तविकता राष्ट्रीय सुरक्षा आहे.” मुलांच्या विकासात शुद्ध दुधाची उपलब्धता हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, असे इम्रान म्हणाले. Fact Check: कोरोनाची तिसरी लाट येणार, पुन्हा लॉकडाऊन होणार? वाचा काय आहे सत्य चीनच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी आपल्या जवळच्या मित्राचं उदाहरण देत म्हटलं की, जर देश सध्या आहे त्याच अवस्थेत राहिला तर अन्न सुरक्षा हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा बनेल. इम्रान म्हणाले, “जर एखादा देश आपल्या लोकांना चांगला आहार देऊ शकत नसेल तर तो कधीच प्रगती करू शकत नाही. जर 15-40 टक्के लोक भुकेले असतील तर याचा देशाच्या विकासावर मोठा परिणाम होईल. जो देश आपल्या लोकांना पुरेसा आहार देऊ शकत नाही त्याला शिक्षा झाली पाहिजे, असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







