मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

प्रवाशांना घेऊन जात होतं विमान; अचानक स्क्रीनवर दिसू लागले रक्ताचे थेंब, आणि...

प्रवाशांना घेऊन जात होतं विमान; अचानक स्क्रीनवर दिसू लागले रक्ताचे थेंब, आणि...

पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

पायलटने प्रसंगावधान राखल्यामुळे मोठा अपघात टळला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

रोम, 30 नोव्हेंबर : अनेकदा आकात उडताना पक्ष्यांनी विमानाला (Flight) धडक दिल्यामुळे मृत्यू झाल्याच्या बातम्या तुम्ही ऐकल्या असतील. मात्र नुकताच इटलीमधून एक विचित्र प्रकार समोर आला आहे. यामध्ये हवेत उडताना एक विमान पक्षाच्या (Birds) थव्याला जाऊन धडकला. आणि यानंतर प्लेनच्या इंजिनला आग लागली. कारण पक्ष्यांना धडक दिल्यानंतर त्यांचे रक्ताचे थेंब आणि पक्ष्याच्या तुटलेल्या पंखांमुळे प्लेनची विंडस्क्रीन झाकली गेली. ज्यामुळे पायलटचा समोरील काहीच दिसेनासं झालं. (plane was carrying passengers Suddenly drops of blood appeared on the screen)

मिळालेल्या माहितीनुसार, इटलीच्या बोलोग्ना एयरपोर्टवर (Bologna Airport) लँडिंग होण्याच्या काही वेळापूर्वी रायनएयर जेट (Ryanair Jet) पक्षाच्या थव्याला धडक दिली.

हे ही वाचा-सीलिंगमधून गोळी गेली आरपार; खालच्या मजल्यावर झोपलेल्या भारतीय मुलीचा गेला जीव

विंडरस्क्रीनवर रक्ताचे थेंब पसरले..

'डेली मेल'च्या एका बातमीनुसार, रायनएयर बोइंग 737-800 विमान लंडनहून प्रवाशांना घेऊन रवाना झालं होतं. फोटोमध्ये पाहू शकता की, पक्षांच्या थव्याला धडक दिल्यानंतर विंडशील्ड रक्तबंबाळ झाली. विमानातील अनेक भागात पक्षांचे पंख अडकले होते. इंजिनमध्येही अनेक पक्षी घुसले होते, ज्यानंतर विमानाच्या इंजिनमध्येच आग लागली.

इंजिनमधून निघत होत्या आगीच्या ज्वाळा..

हे विमान इटलीच्या एअरपोर्टवरुन रनवेवर पोहोचण्यापूर्वी ही घटना घडली. या सर्व प्रकरणात इंजिनचं मोठं नुकसान झालं आहे. या घटनेचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. ज्यात हवेत उडणाऱ्या विमानाच्या इंजिनमधून आगीच्या ज्वाळा दिसत आहेत. अशात पायलटने सावधगिरी बाळगत विमान लँड केलं. पायलटने विमान सुरक्षित खाली उतरवलं. सुदैवाने या अपघातात विमानातील प्रवाशांना काहीही त्रास झाला नाही.

First published:

Tags: Travel by flight