मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

पिझ्झा, सँडवीच खाणाऱ्या स्त्रिया टीव्हीवर दिसता कामा नयेत; तालिबान नव्हे, तर ‘या’ देशाने काढलाय नवा फतवा

पिझ्झा, सँडवीच खाणाऱ्या स्त्रिया टीव्हीवर दिसता कामा नयेत; तालिबान नव्हे, तर ‘या’ देशाने काढलाय नवा फतवा

Iran Television censorship: स्त्रियांनी लेदरचे ग्लोव्ह्ज घातलेले दाखवू नये, पुरुष स्त्रीसाठी चहा करतोय किंवा देतोय असं दृश्यही वेब सीरिज किंवा टीव्हीच्या पडद्यावर दाखवायचं नाही, असले नियम केले गेले आहेत.

Iran Television censorship: स्त्रियांनी लेदरचे ग्लोव्ह्ज घातलेले दाखवू नये, पुरुष स्त्रीसाठी चहा करतोय किंवा देतोय असं दृश्यही वेब सीरिज किंवा टीव्हीच्या पडद्यावर दाखवायचं नाही, असले नियम केले गेले आहेत.

Iran Television censorship: स्त्रियांनी लेदरचे ग्लोव्ह्ज घातलेले दाखवू नये, पुरुष स्त्रीसाठी चहा करतोय किंवा देतोय असं दृश्यही वेब सीरिज किंवा टीव्हीच्या पडद्यावर दाखवायचं नाही, असले नियम केले गेले आहेत.

नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर: बऱ्याच देशांमध्ये टेलिव्हिजन सेन्सॉरशिपबाबत (Iran Television censorship) वेगवेगळे नियम असतात. कित्येक वेळा हे नियम गरजेचे असतात, मात्र काही वेळा हे नियम पाहून डोक्याला हात लावण्याची वेळ येते. इराणमध्ये सध्या लागू करण्यात आलेले टीव्ही सेन्सॉरशिप (Iran Censor rules) नियम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंगने (IRIB) हे निर्बंध लागू केले आहेत.

पिझ्झा, सँडविच लाल पेयावर बंदी

आयआरआयबीने जारी केलेल्या नियमांमध्ये असं सांगण्यात आलं आहे, की टीव्हीवर महिलांना पिझ्झा खाताना (Woman Eating Pizza banned) दाखवता येणार नाही. यासोबतच, महिलांना स्क्रीनवर कोणतेही लाल रंगाचे पेय पिताना (Red coloured beverages) दाखवता येणार नाही. तसेच, टीव्हीवर महिला सँडविच खातानाही दाखवता येणार नाही (Women can’t eat sandwich on TV). आयआरआयबीच्या जनसंपर्क विभागाचे प्रमुख आमीर हुसैन शमशादी यांनी या नियमांबाबत माहिती दिली. झी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

या नव्या सेन्सॉरशिपमध्ये आणखीही काही विचित्र नियम आहेत. यानुसार, महिलांना टीव्हीवर लेदर ग्लोव्हज (हातमोजे) घालता (Women wearing Leather gloves) येणार नाहीत. तसेच, कामाच्या ठिकाणी दाखवण्यात येणाऱ्या प्रसंगांमध्ये पुरूष महिलांना चहा सर्व्ह करत आहेत, असं दृष्य दाखवता येणार नाही. विशेष म्हणजे, घरामध्ये पुरूष आणि महिला (Scenes where men and women are together) एकत्र असणारा कोणताही सीन प्रसारित करण्यापूर्वी आयआरआयबीची परवानगी घ्यावी लागणार आहे.

टीव्हीसोबत चित्रपट आणि वेब सीरीजसाठीही नवे नियम

डेली मेलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, आयआरआयबीने चित्रपट निर्माते आणि वेब सीरीज निर्मात्यांसाठी (IRIB rules for Film and web Producers) नवे निर्देश जारी केले आहेत.

असं होतं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट, उत्खननात सापडलं ‘नवकोट नारायणा’चं शौचालय

यानंतर आपले प्रसारण थांबू नये यासाठी कित्येक स्ट्रीमिंग साईट्स सेल्फ सेन्सॉर (Iranian streaming platforms censor) करत आहेत. इराणमध्ये होम थिएटर आणि स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर देखरेख ठेवण्यासाठी आणि त्याबाबतचे लायसन्स देण्यासाठी आयआरआयबीने सतरा नावाच्या कंपनीला नेमले आहे.

ब्रॉडकास्टर्समध्ये भीतीचे वातावरण, कलाकारांमध्ये रोष

या नवीन नियमावलीमुळे इराणी ब्रॉडकास्टर्समध्ये भीतीचं वातावरण आहे. पिशगू नावाच्या एका इराणी टॉक शोमध्ये तर प्रमुख पाहुणी म्हणून आलेल्या अभिनेत्रीचा चेहराही (Actress face hidden in talk show) दाखवण्यात आला नाही. नामवा स्ट्रीमिंग साईटवर प्रसारित होत असलेल्या या शोमध्ये एल्नाज हबीबी ही अभिनेत्री उपस्थित होती. मात्र, पूर्ण एपिसोडमध्ये प्रेक्षकांना केवळ तिचा आवाजच ऐकवण्यात आला. या प्रकारावर अभिनेता अमीन तारोखने रोष व्यक्त केला. इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याने आपली नाराजी दर्शवली.

तालिबानी सत्तेत कृरतेचा कळस! चोरीच्या आरोप असलेल्या तिघांना घातल्या गोळ्या

एकूणच इराणमध्ये सध्या सरकार टीव्ही, चित्रपट आणि वेब कंटेंटवर मोठ्या प्रमाणात निर्बंध लादले जात आहेत. त्यामुळे तेथील निर्मात्यांना आता नवीन नियमांना लक्षात ठेऊन, त्यानुसार गोष्टी दाखवाव्या लागणार आहेत.

First published:

Tags: Censorship, Iran, Women