जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / असं होतं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट, उत्खननात सापडलं ‘नवकोट नारायणा’चं शौचालय

असं होतं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट, उत्खननात सापडलं ‘नवकोट नारायणा’चं शौचालय

असं होतं 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट, उत्खननात सापडलं ‘नवकोट नारायणा’चं शौचालय

पुरातत्व विभागाकडून सुरु असलेल्या उत्खननात (27 thousand year old toilet found) नुकतंच एक 27 हजार वर्षांपूर्वीचं टॉयलेट सापडलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

जेरुसलेम, 7 ऑक्टोबर : सध्या जगभरात इंडियन आणि वेस्टर्न हे टॉयलेटचे (27 thousand years old toilet found while digging) दोनच प्रकार माहित आहेत. स्वच्छ भारत योजनेमुळे गेल्या काही वर्षांपासून घरोघरी टॉयलेट बांधायला सुरुवात झाली आहे. अद्यापही अनेक ठिकाणी नागरिक शेतात किंवा मोकळ्या मैदानावर शौचासाठी जातात. त्यामुळे काही हजार (History of human  toilet trends) वर्षांपूर्वी सगळेच नागरिक उघड्यावर शौच करत असावेत, असं वाटण्याची शक्यता आहे. मात्र हे खरं नाही. इस्रायलची राजधानी जेरुसलेममध्ये (Ancient toilet found in Jerusalem) एका पुरातन टॉयलेट सापडलं आहे. असं आहे टॉयलेट जेरुसलेम या ऐतिहासिक शहरात सतत उत्खनन सुरु असतं. वेगवेगळ्या काळातील संस्कृतींचा अभ्यास त्यातून केला जातो. या उत्खननात नुकतंच एक टॉयलेट सापडलं आहे. सुमारे 27 हजार वर्षांपूर्वीचं हे टॉयलेट असून ते अति श्रीमंत व्यक्तीनंच बांधलं असण्याचा अंदाज संशोधक व्यक्त करत आहेत. श्रीमंतांचं टॉयलेट 27 हजार वर्षांपूर्वी ज्या प्रकारचं टॉयलेट बांधण्यात आलं -आहे, त्यावरून ते कुणाही गरिबाला बांधणं शक्य नसल्याचं दिसतं. प्रचंड खर्च करून आणि अनेक मजुरांच्या मेहनतीनं हे टॉयलेट बांधल्याचं दिसतं. हे एक मोठं न्हाणीघर असून टॉयलेट हा त्याचाच एक भाग आहे. ज्या ठिकाणी हे टॉयलेट सापडलं तिथं एक भलीमोठी राजवाड्यासारखी इमारत होती. तिथं राहणाऱ्या एखाद्या शौकीन श्रीमंतानं हे टॉयलेट बांधलं असण्याची शक्यता आहे. हे वाचा - मोठी बातमी: शाळेत घुसून दहशतवाद्यांचा गोळीबार, दोन शिक्षकांचा मृत्यू कसं आहे टॉयलेट बसायला सुटसुटीत असं हे टॉयलेट असून मलमुत्र वाहून नेण्यासाठी खोल खड्डा खणल्याचं दिसतं. त्यानंतर खाली सेप्टिक टँकदेखील आढळून आला आहे. या टँकमध्ये जनावरांची हाडं आणि काही भाड्यांचं अवशेषदेखील मिळाले आहे. त्यावरून 27 हजार वर्षांपूर्वी कुठले प्राणी अस्तित्वात होते, त्यावेळची खाद्यसंस्कृती कशी होती वगैरे बाबींचा शोध घेतला जाणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: history , israel
  • First Published :
जाहिरात
जाहिरात