मराठी बातम्या /बातम्या /विदेश /Shocking! पाळीव कुत्र्यानेच 2 आठवड्यांच्या बाळाचे तोडले लचके; 23 वेळा चावा घेत मालकाच्या लेकाचा घेतला जीव

Shocking! पाळीव कुत्र्यानेच 2 आठवड्यांच्या बाळाचे तोडले लचके; 23 वेळा चावा घेत मालकाच्या लेकाचा घेतला जीव

Pet dog attack on baby : पाळीव कुत्र्याने मालकाच्या बाळावर केला खतरनाक हल्ला.

Pet dog attack on baby : पाळीव कुत्र्याने मालकाच्या बाळावर केला खतरनाक हल्ला.

Pet dog attack on baby : पाळीव कुत्र्याने मालकाच्या बाळावर केला खतरनाक हल्ला.

लंडन, 12 जानेवारी :  हल्ली बरेच लोक आपल्या घरात कुत्रे पाळतात. लहान मुलं असतील तर त्यांच्यासोबत खेळायला म्हणा किंवा त्यांच्या सुरक्षेसाठी म्हणून पालक मुद्दामहून घरात कुत्रा ठेवतात. तुम्ही सोशल मीडियावर बरेच व्हिडीओ पाहिले असतील, ज्यात घरात पाळलेले हे कुत्रे घरातील लहान मुलांच्या आजूबाजूलाच असतात. त्यांना प्रोटेक्ट करताना, त्यांच्यासोबत खेळताना, झोपताना दिसतात. पण प्रत्येक वेळी असंच चित्र असेल असं नाही. काही वेळा पाळीव कुत्रे भटक्या कुत्र्यांपेक्षाही खतरनाक ठरू शकतात (Pet Dog attack baby). असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे (Pet Dog killed baby).

भटक्या कुत्र्याने हल्ला केल्याची बरीच प्रकरणं तुम्ही पाहिली असतील. पण एका पाळीव कुत्र्यानेही आपल्याच मालकाच्या मुलावर खतरनाक हल्ला करत त्याचा जीव घेतला आहे. अवघ्या 2 आठवड्यांच्या बाळाला कुत्र्याने तब्बल 23 वेळा चावा घेतला (Pet Dog bites baby 23 time). त्यामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. इंग्लंडच्या कॅम्ब्रिजशायरमधील ही धक्कादायक घटना आहे.

हे वाचाYuck! तंदुरी रोटीवर थुंकला कुक; हॉटेलमधील किळसवाणा VIDEO VIRAL

डॅनिअल मॅकनल्टी आणि एमी लिचफिल्ड यांनी नोव्हेंबर 2018 मध्ये आई-बाबा बनले, त्यांनी एका मुलाला जन्म दिला. रूबेन मॅकनेकल असं या मुलाचं नाव ठेवलं. त्याला पाळीव कुत्र्यापासून दूर ठेवा, असा सल्ला डॉक्टरांनी एमी आणि डॅनिअलला दिला होता. पण दोघांनीही त्याला गांभीर्याने घेतला नाही. मुलाबाबत त्यांनी केलेल्या हलगर्जीपणाचा भयंकर परिणाम झाला.

रुबेन दोन आठवड्यांचा झाला होता. एमी आपल्या घऱात सोफ्यावर झोपली होती. रुबेन तिच्या शेजारीच होता. तर डॅनिअल घराबाहेर स्मोकिंग कराला गेला होता. जेव्हा तो घरात आला तेव्हा त्याला आपल्या कुत्र्याच्या तोंडाला रक्त असल्याचं दिसलं आणि रुबेनही रक्तबंबाळ झाला होता.

हे वाचा - पित्याने मुलाचं ठेवलं अतिशय विचित्र नाव; आता भलत्याच अडचणींचा करावा लागतोय सामना

दोघांनीही रुबेनला घेऊन रुग्णालयाकडे धाव घेतली. तिथं तपासणीत समजलं की कुत्र्याने त्याच्या डोक्याला 23 वेळा चावा घेतला होता. या घटनेच्या आठवडाभरानंतरच त्याचा मृत्यू झाला, असं वृत्त डेली मेलने दिलं आहे.

त्यामुळे तुम्हीही तुमच्या घरात कुत्रा पाळला असेल आणि तुमच्या घरात लहान मूलही असेल तर सावध राहा. ही वेळ तुमच्यावर ओढावू देऊ नका.

First published:
top videos

    Tags: Baby died, Dog, Owner of dog, Uk