जाहिरात
मराठी बातम्या / Viral / Yuck! Tandoori roti वर थुंकला कुक; हॉटेलमधील किळसवाणा VIDEO VIRAL

Yuck! Tandoori roti वर थुंकला कुक; हॉटेलमधील किळसवाणा VIDEO VIRAL

Yuck! Tandoori roti वर थुंकला कुक; हॉटेलमधील किळसवाणा VIDEO VIRAL

हॉटेलमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद.

  • -MIN READ
  • Last Updated :

लखनऊ, 12 जानेवारी :  काही कारणामुळे आपण घरचा डबा घेऊन जात नाही. त्यानंतर आपण बाहेर काहीतरी खातो. पण असे खाद्यपदार्थ सुरक्षित असतीलच असं नाही. सोशल मीडियावर असे काही व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकताच असाच धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात एक व्यक्ती तंदुरी रोटीवर थुंकताना दिसली (Cook spitting on tandoori roti). एका हॉटेलमधील किळसवाणा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. व्हिडीओत पाहू शकता एक तरुण उभा आहे. तो पीठ मळताना दिसतो आहे. त्याचवेळी तो पीठावर थुंकतोही. कुकचा हा प्रताप एका व्यक्तीने आपल्या कॅमेऱ्यात कैद केला आणि सोशल मीडियावर पोस्ट केला. लखऊनतील काकोरी परिसरातील हे हॉटेल असल्याचं सांगितलं जातं आहे.

जाहिरात

सुशील राजपूत नावाच्या व्यक्तीने सोशल मीडियावर हा अपलोड केला होता, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच  अखेर पोलिसांनी कारवाई केली. कुकसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. महासाथी अधिनियमाअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशा बेजबाबदारपणामुळे आजार किंवा संसर्ग पसरण्याचं काम ही व्यक्ती करत आहे. हे वाचा -  कारसाठी फळविक्रेत्याच्या ‘पोटावर लाथ’; लेडी प्रोफेसरच्या संतापजनक कृत्याचा VIDEO झी न्यूजच्या वृत्तानुसार काकोरीचे सहाय्यक पोलीस आयुक्त आशुतोष कुमार यांनी सांगितलं की, जेवण बनवणाऱ्या या व्यक्तीसह हॉटेलमालक याकूबलाही अटक करण्यात आली आहे. याआधी एका बेकरीतील असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. जिथं बेकरीतील कर्मचारी टोस्टवर थुंकताना दिसला. व्हिडीओत पाहू शकता ट्रेमध्ये टोस्ट आहेत आणि कामगार त्याच्यावर पाय ठेवून बसले आहेत.

एका कामगाराने तर हद्दच केली आहे. तो ट्रेमधील टोस्टवर पुन्हा पुन्हा पाय मारतो. त्यानंतर ते हातात घेऊन त्यावर थुंकतो, नंतर चाटतो आणि मग पिशवीत भरतो. कामगाराचा हा प्रताप पाहून अक्षरशः उलटी येते. तळपायातील आगही मस्तकात जाते. एकप्रकारे लोकांच्या जीवाशीच हे लोक खेळत आहेत. हे वाचा -  बापरे! ही रेस्टॉरंटमधील सर्वात महागडी डिश आहे? किमतीऐवजी पदार्थ पाहूनच फुटेल घाम हा व्हिडीओ कुठला आहे आणि कधीचा आहे हे माहिती नाही. पण कामगार जे काही करत आहे, त्यानंतर आता टोस्टही खायचा की नाही, असाच प्रश्न पडतो आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात