नवी दिल्ली 03 मे : काही घटना अशा असतात, ज्यावर विश्वास ठेवणं कठीण जातं. लोक याला सामान्य भाषेत चमत्कार म्हणतात. असाच एक चमत्कार घडला, जेव्हा एक महिला स्वतःच्या अंत्यविधीदरम्यान उठून उभी राहिली (Dead Woman Gets Alive). लोक तिला मृत समजून तिचा अंत्यविधी करत होते. परंतु महिला शवपेटी वाजवत, ती खोलण्यासाठी मदत मागू लागली (Dead Woman Came Out of Coffin). VIDEO: जबरदस्ती तरुणाच्या गळ्यात साप टाकून पैसे मागू लागला गारूडी; पुढे जे घडलं ते धक्कादायक रोझा इसाबेल असं या महिलेचं नाव असून ती पेरूमध्ये राहते. तिचा अपघाती मृत्यू झाला आणि लोक तिच्यावर अंतिम संस्कार करत होते, त्याच दरम्यान एक चमत्कार घडला. रोझा शवपेटीतून बाहेर आली आणि तिच्या मृत्यूमुळे अश्रू ढाळणाऱ्या लोकांचे डोळे आश्चर्याने चमकले. असं काही घडेल, याची कोणाला कल्पनाही नव्हती. रोझा इसाबेल हिचा भयंकर अपघात झाला होता. तिच्यासोबत कुटुंबातील इतर काही सदस्यही होते. यापैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक असून रोझा आणि अन्य एका व्यक्तीला मृत घोषित करण्यात आलं होतं. 26 एप्रिल रोजी तिच्यावर अंत्यसंस्कार केले जात होते आणि तिला शवपेटीमध्ये ठेवण्यात आलं. मात्र इतक्यात काहीतरी विचित्र घडलं. अंत्यसंस्काराला उपस्थित नातेवाईक आणि मित्र तिच्या मृत्यूबद्दल अश्रू ढाळत होते, त्याच दरम्यान त्यांना शवपेटी ठोठावल्याचा आवाज आला. लग्नासाठी पाहिलेल्या मुलासोबत असं काही केलं की…; लेकीचा प्रताप पाहून वडीलही शॉक महिला अचानक जिवंत झाल्याचं पाहून लोकांनी पोलिसांना आणि हॉस्पिटलमध्ये फोन केला आणि शवपेटीसह रोझाला तपासासाठी नेण्यात आलं. तिची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला लाईफ सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आलं होतं. ज्यांनी तिला मृत घोषित केलं होतं, त्यांच्याशी कुटुंबीय संपर्क साधू लागले. तिच्या नातेवाईकांचा असा अंदाज आहे की ती बहुधा कोमात गेली होती आणि डॉक्टरांना तिचा मृत्यू झाल्याचं वाटलं. पेरू पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.