जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / अफगाणिस्तानात अन्नाची टंचाई, पोटासाठी 1 लाखाची वस्तू विकली जातेय 25 हजारात

अफगाणिस्तानात अन्नाची टंचाई, पोटासाठी 1 लाखाची वस्तू विकली जातेय 25 हजारात

अफगाणिस्तानात अन्नाची टंचाई, पोटासाठी 1 लाखाची वस्तू विकली जातेय 25 हजारात

अफगाणिस्तानात सध्या अन्नधान्याची प्रचंड (Food shortage in Afghanistan) टंचाई निर्माण झाली असून केवळ पोट भरण्यासाठी नागरिक घरातील महागड्या वस्तू विकत (People selling furniture for food) असल्याचं दिसून आलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

काबुल, 19 सप्टेंबर : अफगाणिस्तानात सध्या अन्नधान्याची प्रचंड (Food shortage in Afghanistan) टंचाई निर्माण झाली असून केवळ पोट भरण्यासाठी नागरिक घरातील महागड्या वस्तू विकत (People selling furniture for food) असल्याचं दिसून आलं आहे. स्वतःचं आणि कुटुंबीयांचं पोट भरण्यासाठी नागरिक घरातील फ्रीज, वॉशिंग मशीन, बेड आणि फर्निचरसारख्या महागड्या वस्तू कवडीमोल भागात विकत असून त्याबदल्यात अन्नधान्य आणि भाजीपाला विकत घेत असल्याचं चित्र आहे. पोटासाठी वाट्टेल ते अफगाणिस्तानमध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून महागाईनं कळस गाठला आहे. अन्नधान्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. अन्नधान्य विकत घेण्यासाठी नागरिकांकडे पैसेही उपलब्ध नसल्यामुळे घरातील सामान विकण्याचं प्रमाण वाढलं आहे. काबुल आणि परिसरातील सर्व बाजारपेठांमध्ये नागरिक घरातील महागड्या वस्तू विक्रीसाठी घेऊन येत असून कवडीमोल किंमतीला त्या विकत आहेत. एक लाखाची वस्तू 2 हजारात अनेक महागड्या वस्तू त्यांच्या मूळ किंमतीच्या पावपट रकमेत खरेदी विक्री केल्या जात असल्याचं चित्र आहे. आपण 25 हजारांना घेतलेला फ्रीज केवळ 5 हजारांना विकल्याचं एका दुकानदारानं ‘टोलो न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. या पैशांतून आपण आपल्या मुलांसाठी तांदूळ विकत घेतल्याचं त्यानं सांगितलं. घरातील महागडी वस्तू जेव्हा विकतो, तेव्हाच मुलंबाळं पोटभर जेवण करून झोपू शकतात, अशी व्यथा त्यानं माध्यमांसमोर मांडली आहे. हे वाचा - काबुल विमानतळावरील आत्मघातकी हल्लेखोर होता भारतातील तुरुंगात, ISIS चा दावा बेरोजगारीचा कळस तालिबानची सत्ता आल्यानंतर अनेक अधिकारी सध्या बेकार आहेत. अनेक सरकारी संस्था बंद पडल्या असून त्यांना पगार देण्यासाठी तालिबान सरकारकडे पैसे नसल्याचा हा परिणाम आहे. पाण्याची एक बाटली 40 डॉलरवर म्हणजेच 3 हजार रुपयांवर पोहोचली आहे. तर प्लेट तांदूळ तब्बल 100 डॉलर्सना म्हणजेच साडेसात हजार रुपयांना विकत घ्यावे लागत आहेत. अनेक वस्तू तर केवळ डॉलरमध्येच खरेदी आणि विक्री केल्या जात आहेत. अनेक नागरिक अफगाणी चलन स्विकारत नसल्याचं चित्र आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात