रावळपिंडी (पाकिस्तान) 29 मार्च : पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदू नागरिकांच्या (Hindu in Pakistan) होळीच्या आनंदावर विरजण घालणारी घटना उघड झाली आहे. रावळपिंडी (Rawalpindi) मधील एका 100 वर्षांहून जुन्या मंदिरावर (Temple) अज्ञात लोकांच्या गटाने हल्ला केला आहे. या प्रकरणात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार रावळपिंडीच्या जुना किल्ला परिसरात हे मंदिर आहे. या मंदिराच्या नुतनीकरणाचं काम सध्या सुरू आहे. शनिवारी रात्री 10 ते 15 जणांच्या समुहाने या मंदिरावर हल्ला केला. या मंदिराच्या वरच्या मजल्याच्या दिशेनं जाणारा दरवाजा तसंच पाऱ्यांची या समुहानं नासधूस केली.
'या भागातील उत्तर विभागाचे सुरक्षा अधिकारी सय्यद रझा अब्बास झैदी यांनी या प्रकरणात रावळपिंडीमधील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे,' असं वृत्त 'डॉन' या पाकिस्तानातील वृत्तपत्राने दिलं आहे. या मंदिरासमोरच्या भागात अतिक्रमण करण्यात आलं होतं. हे अतिक्रमण 24 मार्च रोजी हटवण्यात आलं होतं. या मंदिरात सध्या कोणतेही धार्मिक विधी सुरू नव्हते. तसंच त्या ठिकाणी पूजेसाठी कोणतीही मूर्ती ठेवण्यात आली नव्हती, अशी माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. या मंदिराचं पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी झैदी यांनी केली आहे.
यापूर्वी या मंदिराच्या परिसराला अतिक्रमणाचा विळखा पडला होता. जिल्हा प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने हे अतिक्रमण हटवलं होतं. मंदिराची अतिक्रमणाच्या विळख्यातून सुटका केल्यानंतर याच्या नुतनीकरणाचं काम सुरू होतं. या मंदिराचे प्रशासक ओम प्रकाश यांनी देखील हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रावळपिंडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणल्याचं सांगितलं.
( वाचा : पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यानंतर बांगलादेशात हिंसाचार; हिंदू मंदिरं होतायेत लक्ष्य )
रावळपिडीं पोलीस मंदिराप्रमाणेच, प्रकाश यांच्या घराबाहेरही तैनात असल्याचं वृत्त 'द एक्स्प्रेस ट्रिब्यून' नं दिलं आहे. या घटनेनंतर या मंदिरातील होळीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pakistan