मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मोठी बातमी, मुस्लीम आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा

मोठी बातमी, मुस्लीम आरक्षणाला शिवसेनेचा पाठिंबा

मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सकारात्मक भूमिकेत आहे.

मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सकारात्मक भूमिकेत आहे.

मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सकारात्मक भूमिकेत आहे.

    मुंबई, 29 फेब्रुवारी : मराठा, धनगर आरक्षणानंतर मुस्लीम बांधवांनी आरक्षणाची मागणी जोर लावून धरली आहे. मुस्लीम बांधवांना आरक्षण देण्याबाबत महाविकास आघाडी सकारात्मक भूमिकेत आहे. शिवसेनेकडूनही आता मुस्लीम आरक्षणाला समर्थन देण्यात आलं आहे. मंत्री एकनाथ शिंदेंनी नवाब मलिक यांच्या घोषणेला दिला पाठिंबा दिला आहे. सर्व समाजाला सोबत घेऊन जाण्याचा महाविकासआघाडीचा प्रयत्न आहे. ठाकरे सरकार समाजाच्या हिताचे निर्णय घेईल असा विश्वासही यावेळी शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. एकूणच शिवसेनेचा मुस्लीम आरक्षणाला पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. मुस्लीम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळावं ही मागणी गेल्या काही वर्षांपासून मुस्लीम समाज करतोय. आता यासाठी सनदशीर मार्गानं लढा उभारणार असल्यांच खासदार हुसैन दलावाई यांनी सांगितलंय. मुस्लीम आरक्षणासंदर्भात ठाकरे सरकारने एक मोठी घोषणा केली आहे. लवकरच राज्य सरकार मुस्लिमांना आरक्षण मिळवून देण्यासाठी कायदा करणार आहेत. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली आहे. हेही वाचा-नवी मुंबईत राजकीय खळबळ, शिवसेना नेते विजय चौगुले यांना जीवे मारण्याची धमकी मुस्लीम आरक्षणाला भाजपचा विरोध 'धर्माच्या आधारावर आरक्षण देण्याची संविधानात तरतूद नाही. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना 10 टक्के आरक्षणाची घोषणा केली आहे. असं असतानाही राज्य सरकारने मुस्लीम आरक्षण देण्याची घोषणा केली आहे. मात्र आमचा धर्माच्या आधारार आरक्षण देण्यास विरोध आहे,' असं म्हणत भाजप नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुस्लीम आरक्षणाच्या निर्णयावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. मुस्लीम समाजाला धर्माच्या आधारावर आरक्षण दिल्यास राज्यातील ओबीसी आरक्षणावर परिणाम होऊ शकतो. तसंच मराठा आरक्षणदेखील अडचणीत येऊ शकतं, कारण विशेष बाब म्हणून मराठा समाजाला आरक्षण देण्यात आलं होतं,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्तेत सहभागी होत असताना नेमकी कोण-कोणत्या मुद्द्यांबाबत तडजोड केली आहे, असा सवालही फडणवीस यांनी उपस्थित केला आहे. हेही  वाचा-सुट्टी कसली घेता? झेपत नसेल तर खुर्ची सोडा, निलेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर टीका
    Published by:Kranti Kanetkar
    First published:

    Tags: Dhangar aarakshan, Maratha reservation, Muslim reservation, Shivsena

    पुढील बातम्या