जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / गरिबीवर उपाय! आमच्या देशात राहायला या, पाकिस्तानचं जगभरातील श्रीमंतांना आवाहन

गरिबीवर उपाय! आमच्या देशात राहायला या, पाकिस्तानचं जगभरातील श्रीमंतांना आवाहन

गरिबीवर उपाय! आमच्या देशात राहायला या, पाकिस्तानचं जगभरातील श्रीमंतांना आवाहन

आमच्या देशात राहायला या आणि आमच्या तिजोरीत भर घाला, असं जाहीर आवाहन आता पाकिस्ताननं जगभरातील नागरिकांना केलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

इस्लामाबाद, 16 जानेवारी: जगभरातील श्रीमंतांनी (Rich) आपल्या देशात राहायला यावं (Permanent Residency) आणि आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती (Financial condition) मजबूत करण्यात हातभार लावावा, अशी योजना पाकिस्ताननं (Pakistan) आखली आहे. पाकिस्तान सध्या आर्थिक दिवाळखोरीत सापडला असून त्यातून बाहेर पडण्यासाठी मिळेल तो मार्ग शोधत आहे. त्यानुसार आता पाकिस्ताननं चीन, अफगाणिस्तानसह तमाम युरोपीय देशांसाठी आपले दरवाजे खुले केले असून देशात पैसे घेऊन येण्याची मागणी केली आहे. काय आहे योजना? पाकिस्ताननं नुकतंच आपलं पहिलं सुरक्षा धोरण जाहीर केलं. पंतप्रधान इम्रान खान यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाची आर्थिक परिस्थिती सुधारणं या गोष्टीला नव्या धोरणात सर्वाधिक महत्त्व देण्यात आलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानमध्ये जमीन खरेदी करणं आणि कायमस्वरुपी राहणं, याची मुभा नागरिकांना दिली जाणार आहे. पाकिस्तानच्या कायमस्वरुपी नागरिकत्वाचा दाखलाही नागरिकांना देण्यात येईल, असं पाकिस्तानचे माहिती आणि जनसंपर्क मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटलं आहे.   अफगाणिस्तानातून येणार नागरिक अफगाणिस्तानमध्ये गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सत्तांतर झालं. तालिबानची सत्ता आल्यापासून अफगाणिस्तानची परिस्थिती बिकट आहे. त्यामुळे तिथले अनेक बडे व्यापारी आणि गर्भश्रीमंत नागरिक हे टर्की, मलेशिया यासारख्या देशांत राहून सेटल होत आहेत. या नागरिकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी पाकिस्ताननं ही योजना आखल्याचं सांगितलं जात आहे. श्रीमंत अरब आपल्याकडे यावेत आणि त्यांच्या रुपाने पैसेही यावेत, हा यामागचा हेतू असल्याचं सांगण्यात येत आहे.   हे वाचा -

युरोपाकडेही लक्ष युरोपमध्ये असे अनेक नागरिक आहेत, ज्यांना धार्मिक कारणासाठी गुंतवणूक करण्याची इच्छा आहे. अशा नागरिकांना आता अधिकृतरित्या पाकिस्तानमध्ये जमीन आणि इतर मालमत्तेची खरेदी करण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रत्यक्ष राहायला न येता जमिनीची खरेदी विक्री करता येईल, असं धोरण पाकिस्ताननं अंगिकारलं आहे. या धोरणाचा पाकिस्तानला कितपत फायदा होतो आणि खरंच पाकिस्तानमध्ये बडे मासे राहायला येतात का, हे पुढल्या काही वर्षांमध्ये स्पष्ट होणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात