Home /News /videsh /

दहशतवादी शास्त्रज्ञाच्या सुटकेसाठी टेक्सासमध्ये अपहरण नाट्य, पाकिस्तान पुन्हा अमेरिकेच्या रडारवर

दहशतवादी शास्त्रज्ञाच्या सुटकेसाठी टेक्सासमध्ये अपहरण नाट्य, पाकिस्तान पुन्हा अमेरिकेच्या रडारवर

अमेरिकेच्या तुरुंगात असणारी पाकिस्तानी शास्त्रज्ञ अफिया सिद्दीकी आपली बहीण असून तिची सुटका करावी या मागणीसाठी मोहम्मद सिद्दीकी नावाच्या व्यक्तीने चार ज्यू लोकांना ओलीस ठेवलं होतं.

    टेक्सास, 16 जानेवारी: अमेरिकेत (America) कैदेत (Jail) असलेल्या पाकिस्तानी शास्त्रज्ञाच्या (Pakistan Scientist) सुटकेसाठी टेक्सासमध्ये (Texas) भलतंच अपहरण नाट्य (Hostage Drama) रंगलं. टेक्सासमधील एका सिनेगॉगमध्ये (Synagogue) मोहम्मद सिद्दीकी (Mohammad Siddiqui) नावाच्या इसमानं चौघांना होस्टेज ठेवत नवा वाद उभा केला. या अपहरणकर्त्याला ठार करण्यात आलं असलं तरी या निमित्तानं पाकिस्तान आणि दहशतवाद यांचा संबंध जगाच्या पटलावर पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.  काय आहे प्रकरण? पाकिस्तानी-अमेरिकी शास्त्रज्ञ आफिया सिद्दीकी ही सध्या अमेरिकेच्या तुरुंगात शिक्षा भोगत आहे. दहशतवादी कृत्यासाठी तिला 86 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या अफिया सिद्दीकीची सुटका करण्यात यावी, या मागणीसाठी मोहम्मद सिद्दीकीनं चार ज्यू लोकांना टेक्सासच्या एका सिेनेगॉगमध्ये बंदी बनवून ठेवलं. सिद्दीकीकडं काही शस्त्रास्त्रं आणि बॉम्बदेखील होते. या घटनेनं अमेरिकेत एकच खळबळ उडाली आणि FBI चे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.  दोघांची सुटका मोहम्मद सिद्दीकीनं अपहरण करून कोंडून ठेवलेल्या चौघांपेकी दोघांनी आपली सुटका करून घेण्यात यश मिळवलं. त्यांनी FBI ला दिलेल्या माहितीतून सिद्दीकीकडे शस्त्रास्त्रं असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. सुरक्षा यंत्रणांनी सिनेगॉगमध्ये प्रवेश मिळवत दोघा बंदींच्या सुटकेचे प्रयत्न सुरू केले. FBI टी टीम आतमध्ये गेली असता ओलीस ठेवलेले दोघे पळत बाहेर येताना दिसले आणि त्यांच्यामागून हल्लेखोरही पळत होता. FBI च्या टीमला पाहून त्याने आपला मार्ग बदलला आणि त्यानंतर गोळीबारांचे आणि स्फोटांचे जोरदार आवाज आले. अपहरणकर्त्याचा मृत्यू अपहरणकर्त्याचा या घटनेत मृत्यू झाला असून ओलीस ठेवलेल्या सर्वांची सुटका झाल्याचं जाहीर करण्यात आलं. दरम्यान, शास्त्रज्ञ अफिया सिद्दीकी यांच्या वकिलांनी या प्रकाराचा निषेध केला आहे. अफिया आणि त्यांचं कुटूंब कुठल्याही हत्येचं समर्थन करत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.  हे वाचा - पाकिस्तान रडारवर अफिया सिद्दीकी यांची सुटका करण्यात यावी, अशी मागणी पाकिस्ताननं अमेरिकेकडे वारंवार केली होती. मात्र त्यात आतापर्यंत पाकिस्तानला कुठलाही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यानंतर घडलेल्या या घटनेमुळे पाकिस्तानकडे दहशतवादी कृत्याच्या संशयाची सुई वळाली असून पुन्हा एकदा हा देश दहशतवादी कृत्यांसाठी जगाच्या रडारवर आला आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: America, Hostage, Pakistan, Terrorist

    पुढील बातम्या