मराठी बातम्या /बातम्या /विदेश /मर्यादेपेक्षा जास्त खर्च पडला ‘महागात’, फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांना मिळाली कडक शिक्षा

मर्यादेपेक्षा जास्त खर्च पडला ‘महागात’, फ्रान्सच्या माजी राष्ट्राध्यक्षांना मिळाली कडक शिक्षा

फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सारकोजी (Ex French President Nicolas Sarkozy convicted by crossing expenditure limit in election) यांना निवडणुकीत अवैध पैसा वापरल्याप्रकरणी न्यायालयानं एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे.

पॅरिस, 30 सप्टेंबर : फ्रान्सचे माजी राष्ट्रपती निकोलस सारकोजी (Ex French President Nicolas Sarkozy convicted by crossing expenditure limit in election) यांना निवडणुकीत अवैध पैसा वापरल्याप्रकरणी न्यायालयानं एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. 2012 साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वापरलेला पैसा हा (Expenses more than limit) मर्यादेपेक्षा जास्त असल्याचा आरोप सिद्ध होत असून त्याबाबत ते देत असलेलं स्पष्टीकरण (No explanation is accepted says court) स्वीकारार्ह नसल्याचं कोर्टानं म्हटलं आहे. त्यामुळे सारकोजी यांना आता 1 वर्ष नजरकैदेत राहावं लागणार आहे.

काय आहे आरोप?

निकोलस सारकोजी 2012 साली दुसऱ्यांदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवत होते. फ्रान्समधील नियमांनुसार त्या निवडणुकीत एखादा उमेदवार खर्च करू शकत असलेली रक्कम आहे 2.75 कोटी डॉलर. मात्र सारकोजी यांनी याच्या जवळपास दुप्पट पैसा खर्च केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत फ्रान्स्वा ओलांद हे सारकोजी यांचे प्रतिस्पर्धी होते आणि त्यांनी निवडणुकीत बाजी मारली होती. सारकोजी यांनी मात्र या आरोपांचा स्पष्ट इन्कार केला आहे.

काय म्हणाले सारकोजी

सारकोजी यांच्या म्हणण्यानुसार ते प्रचाराच्या काळात व्यस्त होते आणि त्यांच्या निवडणूक प्रचाराची यंत्रणा राबवण्याची जबाबदारी एका कंपनीला देण्यात आली होती. निवडणूक प्रचारादरम्यान होणारा दैनंदिन खर्च आणि त्याचा हिशेब याकडं आपलं लक्षही नसल्याचा त्यांचा दावा आहे. आपल्या टीमने केलेल्या चुकांची शिक्षा आपल्याला देणं योग्य नसल्याचं सारकोजी यांचं म्हणणं आहे. त्याचप्रमाणे इतर लोकांना रोजगार मिळावा आणि ते श्रीमंत व्हावेत, या दृष्टीने आपण खर्च केल्याचं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - UK Fuel Crisis: गॅस स्टेशनबाहेर रांगा, बाटलीभर पेट्रोलसाठी इंग्रजांत हाणामारी

एक वर्षाची शिक्षा

निकोलस सारकोजी यांना आता 1 वर्ष नजरकैदेत राहावं लागणार  आहे. या काळात त्यांच्या मनगटात एक इलेक्ट्रॉनिक पट्टा बांधला जाईल, जो काढून टाकायला मनाई असेल. त्यावरून सारकोजी यांचं लोकेशन सरकारला समजत राहिल. या काळात घरातून बाहेर पडायला मनाई असेल आणि त्यांना देश सोडून बाहेर जाता येणार नाही.

First published:

Tags: Election, Financial fraud, France