मराठी बातम्या /बातम्या /विदेश /पाकिस्तानातून पळालेल्या महिलेच्या बॅगची जगभर चर्चा, मुंबईच्या एका फ्लॅटहून जास्त आहे किंमत

पाकिस्तानातून पळालेल्या महिलेच्या बॅगची जगभर चर्चा, मुंबईच्या एका फ्लॅटहून जास्त आहे किंमत

फराह खान तिने घेतलेल्या हँडबॅगची किंमत तब्बल 90000 डॉलर असल्याचा आरोप केला आहे. या बॅगची भारतीय रुपयानुसार किंमती 68 लाख रुपये होते. मुंबईतील एका फ्लॅटपेक्षाही या बॅगची किंमत अधिक आहे.

फराह खान तिने घेतलेल्या हँडबॅगची किंमत तब्बल 90000 डॉलर असल्याचा आरोप केला आहे. या बॅगची भारतीय रुपयानुसार किंमती 68 लाख रुपये होते. मुंबईतील एका फ्लॅटपेक्षाही या बॅगची किंमत अधिक आहे.

फराह खान तिने घेतलेल्या हँडबॅगची किंमत तब्बल 90000 डॉलर असल्याचा आरोप केला आहे. या बॅगची भारतीय रुपयानुसार किंमती 68 लाख रुपये होते. मुंबईतील एका फ्लॅटपेक्षाही या बॅगची किंमत अधिक आहे.

इस्लामाबाद, 6 एप्रिल : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांची तिसरी पत्नी बुशरा बीबी यांची जवळची मैत्रणि फराह खान (Farah Khan) पाकिस्तान सोडून गेली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे फराह खान पाकिस्तानमधून जवळपास 90 डॉलर घेऊन पळाली असल्याचा आरोप आहे. तिचा विमानातील एक फोटो व्हायरल झाल्यानंतर मोठी चर्चा सुरू आहे. पाकिस्तानचे नेते आणि माजी अर्थमंत्री मिफ्ताह इस्माईल यांनी मंगळवारी फर्स्ट लेडी बुशरा बिबिस यांची जवळची सहकारी फराह खान तिने घेतलेल्या हँडबॅगची किंमत तब्बल 90000 डॉलर असल्याचा आरोप (Handbag Cost 90000 Dollar)  केला आहे. या बॅगची भारतीय रुपयानुसार किंमती 68 लाख रुपये होते. मुंबईतील एका फ्लॅटपेक्षाही या बॅगची किंमत अधिक आहे.

Geo News ने दिलेल्या माहितीनुसार, फराहचा विमानात बसलेला एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर माजी मंत्र्यांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे. फराह खान दुबईला रवाना झाली असून तिचा पती एहसान जमील गुजर आधीच अमेरिकेत गेला आहे. अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि त्यांना इच्छित पदं मिळवून देण्यासाठी फराहने मोठ्या प्रमाणात उधळपट्टी केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. हा सहा अब्ज पाकिस्तानी रुपयांचा मोठा घोटाळा असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

पाकिस्तानच्या मुस्लिम लीगच्या उपाध्यक्षा आणि माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची मुलगी मरियम मवाज यांनी दावा केला आहे, की फराहने इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीच्या सांगण्यावरुन हा भष्ट्राचार केला आहे.

हे वाचा - ..अखेर Imran Khan यांची विकेट पडली, असंख्य नाट्यमय घडामोडींनंतर सत्तेतून 'Out'!

पंजाबचे नुकतेच बडतर्फ झालेले राज्यपास चौधरी सरवर आणि इम्रान खान यांचे जुने मित्र आणि पक्षाचे फायनान्सर अलीम खान यांनीही फराहने पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुझदार यांच्यामार्फत बदल्या आणि पोस्टिंगद्वारे कोट्यवधी कमावल्याचा आरोप केला आहे. इम्रान खान यांचे जवळचे आणखी काही सहकारी देश सोडून जाण्याचा विचार करत असल्याची माहिती आहे.

इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबी यांची जवळची मैत्रिण असलेल्या फराहने विरोधकांनी तिच्यावर भ्रष्ट्राचाराचे गंभीर आरोप लावल्यानंतर देश सोडला असल्याचं मीडिया रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: Imran khan, Pakisatan