मराठी बातम्या /बातम्या /विदेश /

तालिबानचं सरकार आलं! एकही महिला नाही; शुरा काउन्सिल करणार राज्य

तालिबानचं सरकार आलं! एकही महिला नाही; शुरा काउन्सिल करणार राज्य

तालिबानकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार शुरा काउन्सिलच (Shura Council) तालिबानचं प्रतिनिधित्व करेल आणि हे काऊन्सिलच देशाचं सरकार म्हणून काम पाहणार आहे.

  • Published by:  desk news

काबुल, 3 सप्टेंबर : अफगाणिस्तानमध्ये (Afghanistan) तालिबाननं (Taliban) आपल्या सरकारचं (Government) स्वरूप कसं असेल, याची घोषणा (Announcement) केली आहे. तालिबानकडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार शुरा काउन्सिलच (Shura Council) तालिबानचं प्रतिनिधित्व करेल आणि हे काऊन्सिलच देशाचं सरकार म्हणून काम पाहणार आहे. या सरकारमध्ये अपेक्षेप्रमाणे एकाही महिलेचा समावेश करण्यात आलेला नाही.

कोण असेल शुरा काऊन्सिलमध्ये

शुरा काऊन्सिल ही तालिबानमधील ज्येष्ठ आणि अनुभवी मंडळी एकत्र येऊन तयार झालेली यंत्रणा असेल. यामध्ये तालिबानशी संबंधित आणि मुस्लिम धर्माशी संबंधित संस्थांचे महत्त्वाचे पदाधिकारी असणार आहे. शुरा काऊन्सिलच्या मार्गदर्शनाखाली यापुढे अफगाणिस्तानचा कारभार पार पडणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत.

मुस्लिम शरिया कायद्यात सांगण्यात आलेल्या सर्व बाबींचं पालन करणारं राज्य स्थापन करणं हा तालिबानचा उद्देश आहे. त्यासाठी राज्यकारभाराच्या मुळाशी शरिया कायदा असणार आहे. राज्यातील सर्व नियम आणि बंधन, अधिकार आणि कर्तव्य ही शरिया कायद्यात सांगण्यात आलेल्या बाबींवर अवलंबून असणार आहेत, असं तालिबाननं स्पष्ट केलं आहे.

कतारच्या धर्तीवर चालणार कारभार

कतारमध्येदेखील सध्या शुरा काऊन्सिल असून विविध धार्मिक संघटनांमधील पदाधिकारी त्यात समाविष्ट आहेत. देशाबाबतचे सर्व धोरणात्मक निर्णय हे शुरा काऊन्सिलकडून घेतले जातात. त्याचप्रमाणं आता अफगाणिस्तानमधील राज्यकारभाराची रचना करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.

महिलांना डच्चू

तालिबान सरकारमध्ये महिलांना डच्चू देण्यात येणार, हे अपेक्षितच धरलं जात होतं. माहिलांनी बुरख्यात आणि चार भिंतींमध्येच राहावं, हा नियम तालिबाननं आता अधिकृतपणे जाहीर केला आहे. महिलांना कुठलंही काम करण्यावर निर्बंध असणार नाहीत, असं तालिबाननं म्हटलं होतं. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी त्यांनी घरातच राहावं, असा इशाराही देण्यात आला होता. आता सरकारमध्ये एकाही महिलेला स्थान न देता तालिबाननं आपल्या जुन्या राजवटीचीच पुन्हा नव्याने आठवण करून दिली आहे.

First published:

Tags: Afghanistan, Taliban