मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Coronavirus पासून बचावासाठी मास्क वापरण्याचा आग्रह, काळजी घ्या नाहीतर होईल उलट परिणाम

Coronavirus पासून बचावासाठी मास्क वापरण्याचा आग्रह, काळजी घ्या नाहीतर होईल उलट परिणाम

या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.

या मास्कची प्रमुख वैशिष्ट्य हे आहे की हा हवेतील 95% दूषित कणांपासून आपलं संरक्षण करतो. सर्जिकल मास्कपेक्षा हा मास्क जास्त प्रभावी असतो.

मास्क (mask) वापरण्यापासून ते त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंत योग्य काळजी घ्यायला हवी.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 21 एप्रिल : कोरोनाव्हायरसपासून (Coronavirus) स्वत:चा बचाव करण्यासाठी हात धुणं आणि मास्क (mask) वापरणं हे मार्ग आहेत. सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) फक्त सर्दी-खोकला अशी समस्या असलेल्यांनी मास्क वापरावेत सर्वांनी मास्क वापरू नये असं सांगितलं होतं. मात्र आता सर्वांनाच मास्क वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सरकारनंही तशा सूचना दिल्यात.

तुम्ही मास्क वापरलात म्हणजे तुम्ही कोरोनापासून सुरक्षित आहात असं नाही. मास्क वापरण्यापासून ते त्याची विल्हेवाट लावण्यापर्यंत योग्य काळजी घ्यायला हवी. नाहीतर तुम्हाला संरक्षण देणारा हाच मास्क घातक ठरू शकतो.

न्यूज 18 लोकमतशी बोलताना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (IMA) महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, "N95 मास्क खरंतर डॉक्टरांसाठी आहे, सर्वसामान्यांनी ते वापरण्याची गरज नाही. मात्र N95 असो किंवा सर्जिकल कोणताही मास्क एकदाच वापरावा, एकदा काढल्यानंतर पुन्हा वापरू नये"

"कापडी मास्क फारसं सुरक्षित नाही. मात्र काही पर्याय नसेल तर तात्पुरतं संरक्षण म्हणून तुम्ही वापरू शकता. एखाद्या व्यक्तीला सर्दी-खोकला असेल तर जंतू जास्त प्रमाणात हवेत पसरणार नाहीत"

मास्क वापरल्यानंतर अनेक जण ते उघड्यावर असंच फेकून देतात. मात्र त्या मुळे व्हायरस पसरण्याचा धोका अधिक वाढतो. नुकत्याच झालेल्या एका संशोधनानुसार सर्जिकल मास्कवर व्हायरस तब्बल एक आठवडा जिवंत राहतो.

जनरल फिजिशियन डॉ. प्रज्वलित सोनकांबळे यांनी सांगितलं, "मास्क काढताना त्याच्या समोरच्या भागाला स्पर्श करू नका, त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दोरींना पकडून काढा. असे वापरलेले मास्क उघड्यावर टाकू नका. त्यामुळे व्हायरस पसरण्याचा धोका असतो."

मास्कची विल्हेवाट नेमकी कशी लावावी?

याबाबत डॉ. भोंडवे यांनी सांगितलं, "घरातील जितक्या लोकांनी डिस्पोजेबल मास्क वापरला असेल ते सर्व एकत्र करून एका कागदी पिशवीत गुंडाळून सुक्या कच-यात टाकावेत. तर रियुझेबल मास्क दिवसातून किमान 4 वेळा बदलावेत, ते नीट जंतूनाशकात धुवून कोरडे करून वापरावेत"

त्यामुळे मास्क वापरताना ही काळजी जरूर घ्या.

संपादन - प्रिया लाड

First published:

Tags: Coronavirus, Coronavirus symptoms