मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

पालघर प्रकरणावरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, उज्ज्वल निकम म्हणाले...

पालघर प्रकरणावरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह, उज्ज्वल निकम म्हणाले...

'जमावामुळे कदाचित पोलीस आपल्या जीव वाचवण्याचा करिता  घाबरले असतील अर्थात पोलिसांचे हे कृत्याचे कोणतेही समर्थन करू शकत नाही'

'जमावामुळे कदाचित पोलीस आपल्या जीव वाचवण्याचा करिता घाबरले असतील अर्थात पोलिसांचे हे कृत्याचे कोणतेही समर्थन करू शकत नाही'

'जमावामुळे कदाचित पोलीस आपल्या जीव वाचवण्याचा करिता घाबरले असतील अर्थात पोलिसांचे हे कृत्याचे कोणतेही समर्थन करू शकत नाही'

  • Published by:  sachin Salve

जळगाव, 21 एप्रिल : पालघरमध्ये चोर समजून दोन साधू आणि ड्रायव्हर हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात ढवळून निघाले. साधूंना मारहाण करत असताना पोलिसांनी काही का केले नाही? असा सवाल केला जात आहे. या प्रकरणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपली प्रतिक्रिया देत पोलिसांच्या भूमिकेबद्दल भाष्य केलं आहे.

पालघर येथे जमावाकडून तीन जणांची हत्या होणे हा अत्यंत दुर्दैवी प्रकार असून हेतू पुरस्सर हे कृत्य करण्यात आल्याचा आरोप हा दुर्दैवी आहे. या प्रकरणावर राष्ट्रीय रंगाने आरोप न करता राजकारण कुणीही करू नये, अशी प्रतिक्रिया  निकम यांनी दिली.

पालघर येथे जमावाकडून तीन लोकांची हत्या होणे हा अत्यंत दुर्देवी प्रकार आहे. अर्थात त्यातील दोघं साधू होते आणि त्यांच्या वाहनचालक होता.  हे सगळं घडलं तेव्हा हा जमाव  चिडलेला होता. जमावाच्या हातात काठ्या होत्या आणि हा जमाव त्या तिघी निर्दोष व्यक्तींना पोलिसांसमक्ष मारत होता. त्यामुळे यातून राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात येते आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना होती, पोलीस फक्त तीनच होते जमाव अफाट होता, असंही निकम यांनी सांगितलं.

हेही वाचा - मुंबईतील कोरोनाचा आकडा दाखवला जातो त्यापेक्षा खूप मोठा : नितेश राणे

'काही वर्षांपूर्वी धुळे जिल्ह्यात जमावाकडून पाच लोकांची देखील हत्या करण्यात आलेली होती. फरक एवढाच आहे की धुळे येथील घटनेमध्ये पोलीस हजर नव्हते. मात्र इथे तीन पोलीस हजर होते. परंतु, हेतुपुरस्कर हे करण्यात आले हा आरोप अत्यंत दुर्देवी आरोप आहे, असं मला सकृत दर्शनी वाटतं,' असं मतही निकम यांनी व्यक्त केलं.

परंतु, 'पोलिसांनी त्या तिघांना वाचण्याचा प्रयत्न काही केले नाही, असं व्हिडिओ फुटेजवरून दिसते आहे. अर्थात सरकारने या तिघा पोलिसांना निलंबित केले आहे. सीआयडीकडे चौकशी देण्यात आली असून त्यांची खातेनिहाय चौकशी होईल', अशी माहितीही त्यांनी दिली.

हेही वाचा -3 मेनंतर असा असेल लॉकडाऊनचा एक्झिट प्लान, मोदी सरकारची Exclusive स्टोरी

'आपण कोरोनाशी लढतो आहोत. या पार्श्वभूमीवर या घटनेचं राजकारण करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. जमावामुळे कदाचित पोलीस आपल्या जीव वाचवण्याचा करिता  घाबरले असतील अर्थात पोलिसांचे हे कृत्याचे कोणतेही समर्थन करू शकत नाही. पोलिसांची जबाबदारीच ही आहे दुसऱ्यांचे रक्षण करणे. सद् रक्षणाय खल निग्रहणाय. परंतु, या परिस्थितीत पोलीस ते करू शकले नाही याला कारण पोलीस त्या जमावाला घाबरले असण्याची शक्यता आहे. स्वतः चा जीव प्यारा वाटला असेल. काही कारणास्तव पोलिसांचे कृत्याचे समर्थन योग्य ठरत नाही.  मात्र, या प्रकरणावर कुठलेही राजकीय रंगाने कुणीही आरोप करून नये धार्मिक सलोखा शांततेत ठेवला पाहिजे हेच आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे', असं आवाहनही निकम यांनी केलं.

 संपादन - सचिन साळवे

First published:

Tags: Palghar, Ujjwal nikam