जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / हे फक्त पाकमध्ये घडू शकतं! एक पुरुष प्रेग्नेंट असल्याचे आले रिपोर्ट आणि...

हे फक्त पाकमध्ये घडू शकतं! एक पुरुष प्रेग्नेंट असल्याचे आले रिपोर्ट आणि...

हे फक्त पाकमध्ये घडू शकतं! एक पुरुष प्रेग्नेंट असल्याचे आले रिपोर्ट आणि...

अरे बापरे, बरं वाटतं नव्हत म्हणून केली चाचणी, काही तासांनी गरोदर असल्याचे आले रिपोर्ट.

  • -MIN READ
  • Last Updated :

कराची, 24 एप्रिल : जगात कोरोनाव्हायरसने थैमान घातले आहे. पाकिस्तानलाही याची झळ बसत आहे. त्यामुळं सध्या पाकमध्ये 60 वर्षांच्या वरील वुद्धांना कोरोना टेस्ट करण्यास सांगितले आहे. या सगळ्यात पाकमध्ये एक अजब प्रकार घडला. पाकिस्तानच्या खानवेलमध्ये एका 60 वर्षीय पुरुष गरोदर असल्याचे आढळले. खानवेल येथील लॅबने केलेल्या लघवीच्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. दरम्यान, हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं अर्थातच आश्चर्य व्यक्त केले जात होते. गर्भवती असल्याचे रिपोर्ट आलेल्या व्यक्तीचे नाव अल्ला बिट्टा असे आहे. अल्लाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यही चकित झाले आहेत. पण नंतर हा अहवाल खोटा असल्याचे समोर आले. अण्णा-फणनमध्ये खानवेलच्या जिल्हा आयुक्तांनी ही प्रयोगशाळा सील केली आहे. तर, या लॅबचा मालक अमीन याला अटक करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून परवानाविना ही लॅब चालविली जात असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमीन यापूर्वी रुग्णालयात रक्त प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. त्यानंतर त्यांनी प्रयोगशाळा सोडली आणि खानवेल येथे प्रयोगशाळा उघडली, तीही परवानाविना. वाचा- पगार न मिळाल्याने भूक भागवण्यासाठी security गार्ड खातोय गवत

जाहिरात

वाचा- कॅनडीयन पंतप्रधानांच्या अदांवर लाखो तरूणी घायाळ, स्लो मोशन मधला VIDEO व्हायरल आरोग्य विभागाने तपासणी केल्यावर असे आढळले की ही लॅब बेकायदेशीररित्या चालविली जात होती आणि त्याला परवाना देण्यात आलेला नाही. आरोग्य विभागाने सांगितले की, अमीनला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, त्याच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. वाचा- बंद हॉटेलमध्ये बसला लपून, 4 दिवसात संपवल्या 70 दारूच्या बाटल्या

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pregnant
  • First Published :
जाहिरात
जाहिरात