वेलिंग्टन, 26 मे : एकिकडे काही देशांमधील रुग्णालयं कोरोना रुग्णांनी (coronavirus patient) खचाखच भरली आहेत. नव्या रुग्णांसाठी जागा नाही, अशी परिस्थिती आहे. मात्र दुसरीकडे न्यूझीलँडमध्ये (New Zealand) मात्र संपूर्ण देशात रुग्णालयात फक्त एकच कोरोना रुग्ण दाखल आहे. 22 कोरोना रुग्ण खबरदारी म्हणून सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. जवळपास 50 लाख लोकसंख्या असलेल्या या देशात कोरोनाची फक्त 1500 प्रकरणं समोर आली आणि 21 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आता रुग्णालयात फक्त एक कोरोना रुग्ण दाखल आहे, अशी माहिती न्यूझीलँडच्या पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न (Prime Minister Jacinda Ardern) यांनी दिली आहे. 22 कोरोना संक्रमितांची प्रकृती ठिक असून ते सध्या सेल्फ आयसोलेशनमध्ये आहेत. मे महिन्यात या देशात कोणतीही नवीन प्रकरणं समोर आली नाहीत. हे वाचा - 14 दिवसात देशात 70 हजार नवीन रुग्णांची नोंद, तरी आली एक दिलासादायक बातमी पंतप्रधान जेसिंडा यांनी 23 मार्चला एक महिन्याचा लॉकडाऊन जारी केला होता. त्यावेळी देशात फक्त 200 च्या आसपास प्रकरणं होती आणि कुणाचाही मृत्यू झाला नव्हता. म्हणजे फक्त 4 आठवड्यांच्या कालावधीत देशातील संक्रमणाची साखळी तोडण्यात देशाला यश मिळालं. 4 आठवड्यातच पंतप्रधान आर्डर्न यांनी घोषणा केली होती की, “न्यूझीलँडमध्ये कोणत्याही प्रकारे कम्युनिटी ट्रान्समिशन नाही. आपण लढा जिंकलेला आहे” हे वाचा - मुंबईत कोरोनाच्या संकटात परिचारिकांची गर्दी, कारण वाचून तुम्हीही कराल सॅल्यूट यानंतर देशातील लॉकडाऊन हळूहळू संपवण्यात आला. मात्र देशात सोशल डिस्टन्सिंगची कठोर अंंमलबजावणी अद्यापही आहे. पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांनी सांगितलं, देशातील नागरिकांच्या आरोग्याबाबत आम्ही खूप यशस्वी अशी कामगिरी केली आहे, ती कौतुकास्पद आहे. मात्र अजूनही धोका टळलेला नाही. त्यामुळे काही बंधनं कायम राहतील. हे वाचा - पुढचे 5 दिवस या राज्यांसाठी धोक्याचे, हवामान खात्याने दिली महत्त्वाची माहिती जगभरात सध्या कोरोनाव्हायरसची एकूण 5,601,871 प्रकरणं आहेत. 348,145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर 2,381,369 रुग्ण बरे झालेत. संपादन - प्रिया लाड
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.