मुंबईत कोरोनाच्या संकटात भर उन्हात परिचारिकांची गर्दी, कारण वाचून तुम्हीही कराल सॅल्यूट

मुंबईत कोरोनाच्या संकटात भर उन्हात परिचारिकांची गर्दी, कारण वाचून तुम्हीही कराल सॅल्यूट

एखाद्या करोना रुग्णांची काळजी घ्या किंवा करोनाबाधित क्षेत्रात जाऊन डॉक्टर, नर्स किंवा पोलिसांना मदत करा असं सांगितले तर मात्र लॉकडाऊनमध्ये बाहेर कसं पडणार असा बहाणा लोकं देतात. मात्र ठाण्यात आज वेगळं चित्र पहायला मिळालं.

  • Share this:

ठाणे, 26 मे : देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन सुरू आहे. दरम्यान लॉकडाऊनच्या काळात लोकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मनाई कायम आहे. तरी, सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता लोकं रस्त्यावर उतरत आहेत. मात्र एखाद्या करोना रुग्णांची काळजी घ्या किंवा करोनाबाधित क्षेत्रात जाऊन डॉक्टर, नर्स किंवा पोलिसांना मदत करा असं सांगितले तर मात्र लॉकडाऊनमध्ये बाहेर कसं पडणार असा बहाणा लोकं देतात. मात्र ठाण्यात आज वेगळं चित्र पहायला मिळालं.

एकीकडे ठाण्यात कोरोनाबाधितांच्या आकडा दिवसेंदिवस वाढत असताना, डॉक्टर आणि नर्स यांची कमतरता भासत आहे. त्यामुळं ही कमतरता भरून काढण्यासाठी ठाणे महानगरपालिके बाहेर चक्क नर्सेसच्या भरतीसाठी महिलांनी एकच गर्दी केली होती. आश्चर्य म्हणजे इतर ठिकाणी अशा वेळेस सोशल डिस्टन्सिंग पाहायला मिळत नाही मात्र या महिलांनी सोशल डिस्टन्सिंगचे सर्व पाळत उन्हात उभ्या होत्या.

वाचा-14 दिवसात देशात 70 हजार नवीन रुग्णांची नोंद, तरी आली एक दिलासादायक बातमी

केवळ नर्स नाहीतर तर इतर आरोग्य कर्मचारी भरती करता पुरुष मंडळी देखील आली होती. ठाणे महानगरपालिका हद्दीतील रुग्णालयात नर्सेस आणि इतर आरोग्य कर्मचारी भरतीची जाहिरात दिली होती या जाहिरातील प्रतिसाद देत मोठ्या संख्येने महिलांनी या भरती करता हजेरी लावली. कोरोनाच्या संकटात स्वत:हून या महिलांनी दिलेला प्रतिसाद हा ख-या अर्थानं त्या करोना योद्धा होण्यास पात्र आहे हे स्पष्ट होतं.

वाचा-कोरोना रुग्ण वाऱ्यावर तर कर्मचारी आंदोलनावर, मुंबईतल्या केईएममधला गंभीर प्रकार

याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांनी आणि नर्स यांना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, कारण येत्या काळात राज्यात लाखो बेड्स तयार केले जात आहेत मात्र तिथं काम करण्यासाठी डॉक्टर नर्सेसची मात्र मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. त्यामुळं ठाण्यातील या महिलांची उपस्थिती इतरांना आरोग्य सेवेसाठी पुढे येण्याकरिता प्रवृत्त करणारी ठरू शकते.

वाचा-श्रमिक ट्रेनमध्ये तापानं कापत होतं 10 महिन्यांचं बाळ, स्टेशनवर डॉक्टर शोधले पण..

First published: May 26, 2020, 1:03 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading