जुळ्या बहिणी...एकत्र राहूनही एक कोरोना संक्रमित तर दुसरी ठणठणीत; डॉक्टरही हैराण झाले

जुळ्या बहिणी...एकत्र राहूनही एक कोरोना संक्रमित तर दुसरी ठणठणीत; डॉक्टरही हैराण झाले

ब्रिटनमधील (britain) पाच महिन्यांच्या जुळ्या मुलींच्या (twin) प्रकृतीने डॉक्टरांसमोर अनेक प्रश्न उभे केलेत.

  • Share this:

ब्रिटन, 20 मे : एखाद्या व्यक्तीला कोरोनाव्हायरसची (coronavirus) लागण झालेली असेल तर त्या व्यक्तीच्या संपर्कात येणाऱ्या निरोगी व्यक्तीलाही व्हायरसची लागण होते. मात्र ब्रिटनमधील (britain) जुळ्या बहिणींचं प्रकरण पाहून डॉक्टरही हैराण झालेत. आईच्या गर्भात एकत्र आणि जन्मानंतरही एकत्र राहणाऱ्या या जुळ्या बहिणींपैकी एक कोरोना संक्रमित आहे, तर दुसरी पूर्णपणे ठणठणीत आहे. पाच महिन्यांच्या जुळ्या मुलींच्या प्रकृतीने डॉक्टरांसमोर अनेक प्रश्न उभे केलेत.

हे प्रकरण आहे न्यूपोर्टमधील. लिआ (Leia) आणि थिया (Thea) जुळ्या बहिणी. पाच महिन्यांपूर्वी त्यांचा जन्म झाला. मात्र गेल्या महिन्यात लिआमध्ये कोरोनाव्हायरसशी संबंधित असलेल्या कावासाकी आजारासारखी लक्षणं दिसून आली. तर तिच्यासोबत 24 तास असणारी थिया पूर्णपणे निरोगी आहे.

हे वाचा - कोरोना रुग्णाच्या मृतदेहात किती वेळ राहतो व्हायरस? ICMRने दिली महत्त्वाची माहिती

डेली मेलच्या वृत्तानुसार 35 वर्षीय हन्ना गॉडविन  (Hannah Godwin)  यांनी गेल्या महिन्यात आपली मुलगी लिआमध्ये तीव्र ताप दिसून आला. तिच्या शरीरावर अॅलर्जीची लक्षणंही होती. हन्ना यांनी संंबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर ंसंपूर्ण कुटुंबाला न्यूपोर्ट सिटीतील एका रुग्णालयात पाठवण्यात आलं.

लिआच्या रक्तात अँटिबॉडीज सापडल्यात, म्हणजे तिला कोरोनाव्हायरस होता याचं निदान झालं. आता तिच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येते आहे. शिवाय लिआमध्ये दिसणारी लक्षणं वेगळी आहेत. ही कोरोनाव्हायरसशी संबंधित आजाराची आहेत. मात्र कावासाकीची नाहीत. असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

हे वाचा - बाल्कनीतून दीड वर्षांचा चिमुकला कोसळला, अंगावर शहारे आणणारा धक्कादायक VIDEO

मिळालेल्या माहितीनुसार, रॉयल ग्वेंट रुग्णालयातील (Royal Gwent Hospital) तज्ज्ञ यांचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहे.

लिआची आनुवंशिक चाचणी केली जाणार आहे, जेणेकरून तिचं शरीर अशी प्रतिक्रिया का देतं आहे, ते समजून घेता येईळ. तसंच थियाचीही रक्त तपासणी करणार आहेत. जेणेकरून तिला कोरोनाव्हायरस आहे का आणि असेल, तर तिच्या शरीरानं तिच्या बहिणीच्या शरीराप्रमाणे प्रतिक्रिया का दिली नाही? हे तपासता येईल.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 20, 2020, 4:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading