एके काळी बायडन यांच्या कट्टर टीकाकार होत्या कमला हॅरिस; आता उपाध्यक्ष होत रचला इतिहास

एके काळी बायडन यांच्या कट्टर टीकाकार होत्या कमला हॅरिस; आता उपाध्यक्ष होत रचला इतिहास

कमला हॅरिस (Kamala Harris) एकेकाळी जो बायडेन (Joe Biden) यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी होत्या. ओबामा यांच्या कार्यकाळात त्या 'फीमेल ओबामा' म्हणून देखील प्रसिद्ध होत्या. पहिल्या भारतीय, पहिल्या कृष्णवर्णीय अमेरिकन उपराष्ट्राध्यक्ष बनून त्यांनी इतिहास रचला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 21 जानेवारी :  भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आणि आता अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदी (Vice-President) विराजमान झालेल्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी बुधवारी  इतिहास रचला. जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या त्या पहिल्या महिला उपराष्ट्राध्यक्ष बनल्या आहेत. तसेच अमेरिकेच्या सर्वोच्च पदांवर पोहोचणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत. नोव्हेंबरमध्ये आपल्या विजयानंतर त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत आपली आई श्यामला गोपालन(Shyamla Gopalan) यांचा खूप मोठा वाटा असल्याचं म्हटलं होतं. श्यामला या कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या होत्या.

या विजयांनंतर हॅरिस यांनी खूप मोठं उदाहरण इतरांसमोर ठेवलं आहे. उपराष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतील विजयानंतर त्यांनी या पदावर विराजमान होणारी मी पहिली महिला आहे परंतु शेवटची नाही असं म्हटलं होतं. 2003 साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट ऍटर्नी झाल्या. यानंतर मागील वर्षी ऑगस्टमध्ये जो बायडन (Jo Biden) यांनी उपराष्ट्रपती पदासाठी कमला हॅरिस यांची निवड केली होती. विजयी झाल्यानंतर त्या सिनेटमधील तीन आशियायी अमेरिकी सदस्यांमधील एक आहेत. परंतु महत्त्वाचे म्हणजे एकेकाळी हॅरिस या जो बायडन यांच्या कट्टर टीकाकार होत्या.

फिमेल ओबामा या नावाने होत्या प्रसिद्ध

बराक ओबामा(Barack Obama) यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या कार्यकाळात कमला हॅरिस या फिमेल ओबामा म्हणून ओळखल्या जात असत. हॅरिस यांचा जन्म 20 ऑकटोबर 1964 ला झाला आहे. 1960 मध्ये त्यांची आई श्यामला गोपालन (Shyamla Gopalan) या तामिळनाडूमधून अमेरिकेतील यूसी बर्कले स्थलांतरित झाल्या. कमला यांचे वडील डोनाल्ड हॅरिस हे जमैकामधून अर्थशास्राची पदवी घेतल्यानंतर बर्कले येथे पुढील शिक्षणासाठी आले होते. याठिकाणी श्यामला आणि डोनाल्ड यांची भेट झाली. यावेळी मानवाधिकार आंदोलनामध्ये सहभागी असताना या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

आईचा हॅरिस यांच्या जीवनावर मोठा प्रभाव

   55 वर्षांच्या कमला हॅरिस (Kamala Harris) यांचा जन्म कॅलिफोर्नियामधील ऑकलंडचा आहे. त्यांचे आईवडील विभक्त झाल्याने नंतर कमला आणि त्यांची बहीण माया यांचा सांभाळ त्यांच्या आईनेच केला. कमला या सात वर्षांच्या असताना त्यांचे आई वडील विभक्त झाले. परंतु आईने दोन्ही मुलींचा खूप उत्तमपणे सांभाळ केला. भारतीय संस्कृतीशी त्यांची नाळ जोडून ठेवण्यात श्यामला यांनी खूप योगदान दिल्याचे हॅरिस यांनी सांगितले आहे.

बायडन आणि हॅरिस यांच्या प्रचार वेबसाईटवर कमला यांनी आपल्या 'द ट्रुथ्स वी होल्ड'(The Truth We Hold) या आत्मचरित्रात याविषयी लिहिले आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आईला आपण कृष्णवर्णीय मुलींना सांभाळत असल्याची कल्पना होती. त्यांना कायम कृष्णवर्णीय म्हणूनच ओळखले जाणार आहे. परंतु त्यांनी आपल्या मुलींना अशा प्रकारचे संस्कार दिले कि, कॅन्सर संशोधक आणि नागरी हक्क कार्यकर्त्या असलेल्या श्यामला आणि त्यांच्या दोन्ही मुलींना 'श्यामला अँड द गर्ल्स म्हणून ओळखले जाऊ लागले.

हे देखील वाचा :  जो बायडेन यांच्या 'या' निर्णयाचा होणार पाच लाख भारतीयांना फायदा!

वकील डग्लस एमहॉफ यांच्याशी केला विवाह

अमेरिकेतल्या हार्वर्ड विद्यापीठात कमला यांनी शिक्षण घेतलं. हार्वडमधल्या शिक्षणानंतर कमला हॅरिस यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी अल्मेडा काऊंटीच्या डिस्ट्रिक्ट ऍटर्नी कार्यालयापासून करिअरला सुरुवात केली. 2003 साली त्या सॅन फ्रान्सिस्कोच्या डिस्ट्रिक्ट ऍटर्नी झाल्या. 2010 मध्ये त्या कॅलिफोर्नियाच्या पहिल्या महिला आणि कृष्णवर्णीय अटॉर्नी बनल्या होत्या. 2017 साली त्यांची निवड कॅलिफोर्नियाच्या ज्युनियर युएस सिनेटर म्हणून झाली. 2014 मध्ये कमला हॅरिस यांनी डग्लस एमहॉफ यांच्याशी लग्न केलं. यामुळे हॅरिस या अमेरिकी, भारतीय, आफ्रिकी आणि यहुदी परंपरांशी देखील जोडल्या गेल्या आहेत.

Published by: Aditya Thube
First published: January 21, 2021, 6:46 PM IST

ताज्या बातम्या