मराठी बातम्या /बातम्या /विदेश /जो बायडेन यांच्या 'या' निर्णयाचा होणार पाच लाख भारतीयांना फायदा!

जो बायडेन यांच्या 'या' निर्णयाचा होणार पाच लाख भारतीयांना फायदा!

जो बायडेन (Joe Biden) यांनी  अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भारतीयांच्या (Indians) हिताचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नव्या निर्णयाचा तब्बल 5 लाख भारतीयांना फायदा होणार आहे.

जो बायडेन (Joe Biden) यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भारतीयांच्या (Indians) हिताचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नव्या निर्णयाचा तब्बल 5 लाख भारतीयांना फायदा होणार आहे.

जो बायडेन (Joe Biden) यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भारतीयांच्या (Indians) हिताचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नव्या निर्णयाचा तब्बल 5 लाख भारतीयांना फायदा होणार आहे.

वॉशिंग्टन, 21 जानेवारी : जो बायडेन (Joe Biden) यांनी  अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रं हाती घेताच भारतीयांच्या (Indians) हिताचा निर्णय घेतला आहे. बायडेन यांनी अमेरिकेतील इमिग्रेशन पॉलिसी (Immigration Policy) बदलण्याची तयारी सुरु केली आहे. त्यांनी अमेरिकेनं काँग्रेसला एक विधेयक तयार करण्याची सूचना दिली आहे. या विधेयकाचा मोठा फायदा भारतीयांना होणार आहे.

काय आहे निर्णय?

अमेरिकेतील 1.1 कोटी अप्रवासी विदेशी नागरिकांना स्थायी दर्जा आणि अमेरिकन नागरिकत्व सोप्या पद्धतीनं देण्यात यावं असं हे विधेयक तयार करण्याचा निर्णय बायडेन यांनी घेतला आहे. डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी यापूर्वी घेतलेल्या निर्णयामुळे या सर्व नागरिकांना अमेरिका सोडण्याची भीती सतावत होती.

बायडेन यांच्या या निर्णयाचा पाच लाख भारतीयांना देखील फायदा होणार आहे. या सर्व भारतीयांना देखील अमेरिकेतील नागरिकत्व मिळणं सोपं जाणार आहे.

‘या’ आहेत अटी?

1 जानेवारी 2021 पर्यंत अमेरिकेत राहत असलेल्या अप्रवासी विदेशी व्यक्तींना याचा फायदा मिळणार आहे. त्यासाठी या मंडळींनी अमेरिकन नागरिकांसाठी असलेल्या सर्व जबाबदाऱ्यांचं पालन करत असतील आणि टॅक्स नियमित भरणं आवश्यक आहे. या अटी पूर्ण केल्यानंतर त्यांना 5 वर्षांसाठी अस्थायी कायदेशीर दर्जा दिला जाईल. त्याना ग्रीन कार्ड देखील दिलं जाऊ शकतं. अमेरिकेतील माध्यमांच्या रिपोर्टनुसार, सिनेटर बॉब मेंडज आणि लिंडा सँचेज यांनी या विधेयकाची तयारी सुरु केली आहे.

बायडेन यांनी बदलले निर्णय

अमेरिकेच्या अध्यपदाची सूत्रं हाती घेताच जो बायडेन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचे निर्णय बदलण्याचा धडाका लावला आहे. ट्रम्प प्रशासनानं (Trump Administration) ज्या मुस्लीम देशांमधील नागरिकांना अमेरिकेत प्रवेशासाठी बंदी घातली होती (Muslim Ban) तो निर्णय बायडेन यांनी रद्द केला आहे. बायडेन यांनी अमेरिका आणि मेक्सिको यांच्या देशाच्या सीमेवर उभारण्यात येत असलेल्या मेक्सिको वॉल (Mexico Wall) बनवण्याचा निर्णय देखाल स्थगित केला आहे. त्याचबरोबरच हवामानातील बदलाशी (Climate Change) लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील पॅरिस हवामानविषयक करारामध्ये (International Paris Climate Agreement) अमेरिका पुन्हा सहभागी होणार असल्याची घोषणा केली आहे.

First published:
top videos

    Tags: Joe biden