मॉस्को, 6 फेब्रुवारी : सोशल मीडियावर अनेक चॅलेंजचा ट्रेंड असतो. दरदिवशी काहीतरी नवीन चॅलेंज ट्रेंड होतं. असंच यूट्यूबवर घेतलेलं चॅलेंज पूर्ण करणं एका व्यक्तीला महागा पडलं आहे. या चॅलेंजमुळे एका 60 वर्षीय व्यक्तीला लाईव्ह स्टिमिंगदरम्यानच आपला जीव गमवावा लागला आहे. या घटनेने चॅलेंजवेळी लाईव्ह असलेले सर्वच जण हैराण झाले आहे. एका 60 वर्षीय रशियन व्यक्तीने यूट्यूबवर वोडका पिण्याचं चॅलेंज घेतलं. वोडका पिण्याचा हा संपूर्ण प्रकार यूट्यूबवर लाईव्ह सुरू होता. तो व्यक्ती लाईव्ह सुरू असतानाच 1.5 लीटर वोडका प्यायला आणि लाईव्हदरम्यानच त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अशाप्रकारे त्याचा मृत्यू झाल्याने या घटनेवेळी लाईव्ह असलेल्या सर्वच युजर्समध्ये भीतीचं वातावरण आहे. इंडिया टुडे ने दिलेल्या माहितीनुसार, एका यूट्यूबरने या रशियन व्यक्तीला हे कृत्य करण्यासाठी पैशांची ऑफर दिली होती. सोशल मीडियावर ‘thrash streams’ किंवा ‘trash streams’ असे ट्रॅश ट्रेंड होत असतात. जिथे युजर्सला पैशांच्या बदल्याद अपमानास्पद कृत्य किंवा स्टंट करण्याचं आव्हान केलं जातं. असे स्टंट पाहण्यासाठी अनेक प्रेक्षकही लाईव्ह असतात.
(वाचा - गायीच्या शेणापासून तयार झालेल्या उर्जेवर धावणार बस,पाक मंत्र्याने सांगितला प्लॅन )
स्थानिक मिडिया रिपोर्टनुसार, Yuri Dushechkin असं वोडका पिण्याचं चॅलेंज स्वीकारलेल्या 60 वर्षीय रशियन व्यक्तीचं नाव आहे. एका यूट्यूबरने त्या व्यक्तीला पैशांच्या बदल्यात हवेत दारू पिण्याचं किंवा गरम सॉस पिण्याचं आव्हान केलं होतं. रशियन मीडिया रिपोर्टनुसार, जवळपास दीड लीटर वोडका पियाल्यानंतर हा व्यक्ती लाईव्ह स्ट्रिममध्येच कोसळला आणि त्याचा मृत्यू झाला. गेल्या आठवड्यात Smolensk शहरात घडलेल्या या घटनेची रशियन अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
(वाचा - 7 लाखात घरं केलं खरेदी; आणि घरात सापडला 2 कोटींचा खजिना, VIDEO मध्ये पाहा घटना )
दरम्यान, रशियन संसदेचे सदस्य Alexey Pushkov यांनी अशाप्रकारच्या सोशल मीडियावरील हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या ‘trash streams’ वर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

)







