कॅनडातील (Canada) एका अँटीक दुकानाचा मालकाने (Antique Shop Owner) खरेदी केलेल्या घरामुळे इतका मोठा फायदा होईल असा त्यानं कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. त्याने खरेदी केलेल्या घरात डिजायनर कपडे, जुनी नाणी, सोनं, हिऱ्याच्या अंगठ्या, कॅश आणि चांदीचे डॉलर सापडल्याने तो हैराण झाला. सीबीसी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार एलेक्स आर्चबॉल्डचं म्हणणं आहे की, या घरात एक मोठा पियानो होता, ज्यामुळे त्यांनी बेट्टे-जोन रॅस याच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्ती खरेदी केली. एन्टीक डीलरचं म्हणणं आहे की, त्या घरात इतक्या गोष्टी सापडतील याचा त्याने विचारही केला नव्हता. एडमर्टनचं दुकान क्युरियोसिटी इंकचे मालक मिस्टर ऑर्चबॉल्ड यांनी दिवंगत संगीत शिक्षक बेट्टे-जोन्स आरएसी यांची संपत्ती 10 हजार डॉलरमध्ये खरेदी केली होती. आपल्या स्टोअरसाठी आर्कबोल्ड नियमितपणे जुन्या घरांमधील वस्तुंची खरेदी करतो आणि आपल्याला मिळालेल्या जुन्या गोष्टी यूट्यूबवर शेअर करतो. ते म्हणाले की, पियानो आणि अन्य वस्तू पाहून मी हे घर 10 हजार डॉलरमध्ये खरेदी केलं होतं. मात्र जेव्हा मी घरात पोहोचलो तेव्हा हैराण झालो. त्या घरात इतक्या मौल्यवान वस्तू असतील याचा मी विचारही केला नव्हता. हे ही वाचा- एका चापटीत जमिनीवर लोळवतात 78 वर्षांच्या आजी; VIDEO पाहून लांबूनच दंडवत घालाल ऑर्चबोल्ड म्हणाला की, ते संगीत शिक्षकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते. मात्र ते कधीच घरात आले नाही. घराची किल्ली मिळाल्यानंतर ते घरात आले आणि हैराणचं झाले. संगीत शिक्षकाने घरात खूप सामानं जमा केलं होतं. मी ज्या संगीत शिक्षकाला भेटतो होतो ती मिलिनिअर असल्याचं मला माहीत नव्हतं. त्यांनी यूट्यूबवर घरातील साहित्याचा एक व्हिडिओ केला आहे.
सर्वांत आठवणीत राहणारं म्हणजे येथील गादीच्या खाली चांदीची पट्टी होती. आर्चबोल्ड आणि त्याच्या टीमला कोटमध्ये चांदीची नाणी सापडली, एन्टीक डिलरच्या अंदाजानुसार त्या घरात डॉलर म्हणजे तब्बल 2 कोटी रुपयांचा खजिना मिळाला आहे. ते म्हणतात की, आम्ही घर खरेदी करण्यासाठी 10000 डॉलरची गुंतवणूक केली होती, आणि आम्ही 400000 डॉलरची विक्री केली आहे. ही माझी आतापर्यंतची सर्वात चांगली गुंतवणूक आहे. ज्या पिआनोसाठी आर्नबोल्डने ते घर खरेदी केले होते, तो त्याने स्वत:साठी ठेवला आहे. आता तो एक कॅफे सुरू करण्याचा प्लान करीत असून हा पिआनो तेथे ठेवणार असल्याचं सांगतो.

)







