रूसेल्स, 4 नोव्हेंबर : बेल्जियममधील (Belgium News) एका महिलेचा टेकडीवरुन पडून मृत्यू झाला आहे. महिला 100 फूट खोल दरीच्या कोपऱ्यावर उभी राहून फोटोशूट करीत होती. 33 वर्षीय जो स्नोक्स आपला पती जोएरी जानसेनसोबत बेल्जियम पर्यटनासाठी आली होती. मंगळवारी सकाळी लग्जेमबर्ग भागाजवळील नाद्रिन गावाजवळ फोटोशूट करीत होती. दोघेही शाळेपासून एकमेकांच्या प्रेमात होते आणि 2012 मध्येचं त्यांचं लग्न झालं होतं.
डेलीमेलच्या वृत्तानुसार, महिला 100 फूट ऊंच टेकडीच्या किनाऱ्यावर उभी राहून फोटोशूट (Photoshoot) करीत होती.
तिचा पती तिचे फोटो काढत होता. तेव्हा अचानक तिचा पाय घसरला आणि नदीमध्ये पडल्यामुळे तिचा मृत्यू (Wife death) झाला. लग्जेमबर्ग भागातील अधिकाऱ्याने सांगितलं की, टेकडीच्या टोकावर उभं राहून फोटो काढत असताना महिलेचा पाय घसरला आणि ती ऑर्थे नदीत पडली. यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करीत हेलिकॉप्टरसह घटनास्थळी पोहोचले. बचावानंतर महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला आहे.
हे ही वाचा-बाथरुममध्ये छुपा कॅमेरा पाहून हादरली महिला,3वर्षापासून सुरु होता घृणास्पद प्रकार
त्या दिवशी घरी परतण्याचा होता प्लान
पती जोएरीने सांगितलं की, आम्ही रविवारी फिरण्यासाठी निघाले होते. महासाथीनंतर युरोपमध्ये छोटासा प्रवास करणार होतो आणि काही सुंदर फोटो घ्यायचं होते. 4500 फूट उंचीची टेकडी पाहण्यासाठी दोघेही सकाळी लवकर उठले. त्यांनी सांगितलं की, टेकडीच्या कोपऱ्यावर फोटो काढत असताना पत्नीने मला कुत्रांना पाहायला सांगितलं, मी दुसरीकडे वळलो आणि पुन्हा पत्नीच्या दिशेने पाहिलं तर ती तेथे नव्हती.
अवघ्या 5 सेकंदात आयुष्य बदललं
त्यांनी सांगितलं की, 5 सेंकदापेक्षा कमी वेळात ती खाली कोसळली होती. मला काही ऐकूही आलं नाही. तिच्या ओरडण्याचा आवाज आला नाही. काही सेकंदानंतर तेथे काहीच दिसलं नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.