Home /News /videsh /

OMG! महिलेच्या टेस्टनंतर डॉक्टरांनाही बसला जबर धक्का, युरिन ऐवजी निघाली दारू

OMG! महिलेच्या टेस्टनंतर डॉक्टरांनाही बसला जबर धक्का, युरिन ऐवजी निघाली दारू

या समितीमध्ये नीती आयोगचे सदस्य डॉ वी के पॉल, AIIMS के अध्यक्ष डॉ रणदीप गुलेरिया, विदेश मंत्रालय, बायोटेक्नोलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, यांच्यासह काही इतर तज्ज्ञांचा समावेश आहे.

या समितीमध्ये नीती आयोगचे सदस्य डॉ वी के पॉल, AIIMS के अध्यक्ष डॉ रणदीप गुलेरिया, विदेश मंत्रालय, बायोटेक्नोलॉजी, इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी, यांच्यासह काही इतर तज्ज्ञांचा समावेश आहे.

रक्त तपासल्यानंतर त्यात दारूचे अंश सापडले नाहीत मात्र इतर टेस्टमध्ये दारूचं प्रमाण आढळून आल्यानं डॉक्टरही चक्रावले

    मुंबई, 29 फेब्रुवारी : एका महिलेच्या काही टेस्ट केल्यानंतर आलेले रिपोर्टपाहून डॉक्टरांनाही चांगलाच धक्का बसला आहे. महिलेच्या शरीरात लघवी ऐवजी दारू तयार होत असल्याचं आढळलं आहे. या घटनेमुळे डॉक्टरही काही क्षण बुचकळ्यात पडले. अमेरिकेतील पिट्सबर्ग यूनिवर्सिटीत हा प्रकार घडला. महिलेच्या युरिन टेस्टमध्ये युरिनऐवजी दारू तयार होत असल्याचं लक्षात आलं आहे. या महिलेचं वय 61 वर्ष असल्याचं सांगितलं जात आहे. या महिलेला सोरायसिस आणि डायबेटीसचा त्रास असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे. अशा प्रकारच्या फार क्वचित केसेस असतात असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. अशा स्थितीला वैज्ञानिक भाषेत ऑटो-ब्रेवरी सिंड्रोम असं म्हणतात. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या महिलेचं लिवर ट्रान्सप्लांट करायचं होतं मात्र कुणी डोनर मिळत नसल्यानं त्यासाठी विलंब झाला. युनिवर्सिटी ऑफ पिट्सबर्ग मेडिकल सेंटर इथे डॉक्टरांनी या महिलेच्या अनेक चाचण्या केल्या. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानं डॉक्टरही हैराण झाले. परवानगी नसतानाही महिला दारू पित असल्याचा संशय डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. यासाठी त्यांनी महिलेची ब्लड टेस्ट केली. मात्र त्यामध्ये दारूचं प्रमाण आढळलं नसल्यानं आता मात्र ही बाब चक्ररावण्यासारखी होती. महिला दारू घेत असती तर त्याचं प्रमाण रक्तात आढळलं असतं पण असं नसतानाही महिलेच्या युरिनमध्ये दारू कशी तयार होते हा प्रश्न अद्यापही गोंधळात टाळणारा होता. हेही वाचा-शिक्षक की हैवान? पाण्यात विष कालवून विद्यार्थिनिची केली हत्या एनल्स ऑफ इंटरनल मेडिसिन जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार महिलेच्या युरिनमध्ये साखरेचं प्रमाण अधिक आढळलं ज्याला हाइपरग्लाइकोसूरिया असंही म्हटलं जातं. इतकच नाही तर महिलेच्या रक्तात यीस्टचं प्रमाण अधिक वाढल्यानं ही रक्तातील साखर इथेनॉलमध्ये रुपांतरीत होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे महिलेच्या युरिनमधून दारूसारखा पदार्थ येत असल्याचं वैज्ञानिकांचं म्हणणं आहे. अशा प्रकारचे पेशंट किंवा केसेस ह्या फार क्वचितच असतात असंही डॉक्टरांनी यावेळी सांगितलं. सध्या या महिलेची किडनी ट्रान्सप्लांट करण्यासाठी कुणी डोनर मिळत आहे का? याचा शोधात महिला आणि डॉक्टर आहेत. हेही वाचा-3 दिवसांच्या बाळावर सुरीने केले 20 वार, निर्घृणतेचे कळस पाहून डॉक्टर हादरले
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Health, Lifestyle news

    पुढील बातम्या