राजकोट, 28 फेब्रुवारी : गुजरातच्या राजकोटमध्ये एक माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना घडली आहे. राजकोटच्या महिमा आणि तेबहादादा गावतल्या शेतात तीन दिवसांची मुलगी जखमी अवस्थेत सापडली. या प्रकारानं संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.
आज तक या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, काही तरुणांनी या तीन दिवसांच्या चिमुरडीला कुत्र्यानं तोडातून पकडून घेऊन जाताना पाहिले होते. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून मुलं धावत सुटली. घाबरलेल्या कुत्र्यानं बाळाला जवळच्या शेतात टाकले. जखमी अवस्थेत या चिमुरडीला पाहिल्यानंतर तरुणींना लगेचच 108ला फोनकरून रुग्णवाहिका बोलविली आणि बाळाला रुग्णालयात दाखल केले.
वाचा-शिक्षक की हैवान? पाण्यात विष कालवून विद्यार्थिनिची केली हत्या
चिमुरडीच्या अंगावर होतो 20 घाव
डॉक्टरांनी चिमुरडीवर उपचार करण्यास सुरुवात केली. मात्र बाळाची अवस्था पाहून डॉक्टरांच्या पायाखालची जमिन हादरली. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जन्मानंतर बाळाच्या अंगावर सुरीने वार केले होते. बाळाच्या शरीरावर 20 पेक्षा जास्त चाकूच्या जखमा आहेत. तीन दिवसांच्या बाळाच्या शरीरावर इतक्या गंभीर जखमा पाहून डॉक्टरही आश्चर्यचकित झाले. बाळाला तातडीने रुग्णालयात नेले असता तिचा श्वासही थांबला होता. तथापि, प्रारंभिक उपचारानंतर बाळाला श्वासोच्छ्वास सुरू झाला. सध्या या तीन दिवसांच्या बाळाला राजकोटच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे. या बाळाच्या शरीरावर आणि तोंडावर धूळ होती.
वाचा-धक्कादायक खुलासा, आयबी कॉन्स्टेबल अंकित शर्मांच्या शरीरावर चाकूचे 18 वार
कोणी केले निर्घृणपणे वार?
आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की बाळाच्या शरीरावर 20 पेक्षा जास्त चाकूचे वार कुठून आले? चाकूच्या खुणावरून हे स्पष्ट झाले आहे की मुलीच्या जन्मानंतर जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता. क्रिकेट खेळणार्या तरूणांनी या निष्पाप जीवाला वाचवले. डॉक्टर दिव्या बारड यांनी सांगितले की मुलीच्या पाठीवर चाकूने वार करण्यात आले. तीन दिवसाच्या मुलीच्या शरीरावर ज्या प्रकारे चाकूने हल्ला करण्यात आला, ती केवळ मनाला त्रास देत नाही तर मानवतेलाही लाजवते. मात्र, अद्याप मुलाची आई उघडकीस आली नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat news