प्योगयांग, 16 सप्टेंबर : उत्तर कोरियाने (North Korea) ट्रेनमधून क्षेपणास्त्राची (Missile in train) चाचणी (Test) घेतल्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. या तंत्रज्ञानामुळे आता उत्तर कोरियाला देशातील कुठल्याही ठिकाणाहून क्षेपणास्त्र डागणं शक्य होणार आहे. उत्तर कोरियाच्या शेजारी राष्ट्रांसाठी आणि संपूर्ण जगासाठी ही चिंतेची बाब असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं म्हटलं आहे.
काय आहे यंत्रणा?no
उत्तर कोरियानं पहिल्यांदाच रेल्वेवर क्षेपणास्त्र यंत्रणा विकसित केली आहे. बुधवारी या यंत्रणेची चाचणी करण्यात आली. ट्रेनमधील मिसाईल सिस्टिम वापरून त्यावरून बॅलेस्टिक मिसाईलची टेस्ट कऱण्यात आली. त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघानं चिंता व्यक्त केली आहे. उत्तर कोरियाने केलेली मिसाईल टेस्ट ही शांतता आणि सुरक्षेसाठी चिंतेची बाब असल्याची प्रतिक्रिया फ्रान्सचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत निकोलस रिव्हर यांनी दिली आहे.
उत्तर कोरियाचा इशारा
उत्तर कोरिया आता कुठल्याही आव्हानाचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया हुकुमशाह किम जोंग उन यांनी दिली आहे. उत्तर कोरियाच्या सरकारी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत किम जोंग उन यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या आठवड्यात या ठिकाणी किम जोंग उन यांनी मिलिटरी परेड घेतली होती.
उत्तर कोरियाला होणार हा फायदा
उत्तर कोरियात सर्वदूर रेल्वेचं नेटवर्क पसरलेलं आहे. त्यामुळे देशातील कुठल्याही ठिकाणाहून उत्तर कोरियाला क्षेपणास्त्र डागणं शक्य होणार आहे. मात्र त्याचवेळी उत्तर कोरियाची रेल्वे ही इतरांसाठी सोपं टार्गेट ठरण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
हे वाचा - पाकिस्तान मॉड्यूल: 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाची होणार होती पुनरावृत्ती
शस्त्रास्त्रांची स्पर्धा
उत्तर आणि दक्षिण कोरिया हे शेजारी देश एकमेकांशी गेल्या अनेक वर्षांपासून शस्त्रास्त्र स्पर्धा करत असल्याचं चित्र आहे. दोन्ही देशांकडून नवनव्या पद्धतीची क्षेपणास्त्रं आणि शस्त्रास्त्रं निर्माण केली जात असून युरोपीय देशांची चिंता त्यामुळे वाढत चालली आहे. उत्तर कोरियाने तीनच दिवसांपूर्वी एका वेगळ्या मिसाईलची चाचणी केली होती. रविवारी लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रेल्वेवरून क्षेपणास्त्र डागण्याची चाचणीही यशस्वी झाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ballistic missiles, North korea