मुंबई, 16 सप्टेंबर: मंगळवारी दिल्ली पोलिसांनी 6 दहशतवाद्यांना (Terrorist) अटक केली. त्यापैकी ओसामा आणि जिशान असे होते की त्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूल (Pakistan Terrorist Module)उघड झाल्यापासून सातत्यानं नवनवे खुलासे होत आहेत. आता दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मॉड्यूलचा भाग असलेल्या दहशतवाद्यांना रेल्वे लाईन न (Railway Line) आणि पूल उडवण्याचं ट्रेनिंग देण्यात आलं होतं. यासह, मोठा मेळावा देखील त्यांच्या निशाण्यावर होता. आता या प्रकरणात स्लीपर सेलची भूमिकाही समोर आली आहे.
अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी गेले होते, पण त्यांच्या पासपोर्टवर शिक्का नव्हता, अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे. त्यांनी ग्वाहर बंदराहून सागरी मार्ग निवडला. ओमानहून पाकिस्तानला जात असताना त्यांनी मोटरबोटही मध्येच बदलली.
1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट सारखा प्लान?
यासह, तपासात असे आढळून आले आहे की हे, पाकिस्तान मॉड्यूल 1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर प्लान आखत होते. या रेकी केल्यावर वेगवेगळ्या ठिकाणच्या लोकांना एकत्र भेटायचे होतं, असं प्लानमध्ये समाविष्ट होतं.
सहावीत शिकणारे दोन विद्यार्थी रातोरात झाले 'मालामाल', बँकेत जमा कोट्यवधी रुपये
स्फोटांमध्ये RDXचा होणार होता वापर
या स्फोटांमध्ये RDX चा वापर करण्यात येणार होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. या लोकांना बोटीने ओमान येथून इराणच्या सागरी सीमेवर नेण्यात आले आणि तेथून ते दुसऱ्या बोटीद्वारे गंदरबल जिओनी येथे पोहोचले. तेथून थट्टा येथील फार्म हाऊसवर घेऊन जाण्यात आलं. त्यांना शारीरिक ट्रेनिंग देण्याचाही प्रयत्न करण्यात आला. पण 15 दिवस थांबल्यावर त्यांना सिरियल ब्लास्टचे टास्क देऊन पुन्हा भारतात परत पाठवण्यात आलं.
आता दिल्ली पोलिसांचे स्पेशल सेल ओसामाचा काका हुमैदचा शोध घेत आहे. ती परदेशात पळून जाऊ नये म्हणून त्याच्या विरोधात LOC जारी करण्याची तयारी करत आहे. त्याचबरोबर ओसामाच्या वडिलांना दुबईहून भारतात आणण्यासाठी CBIच्या माध्यमातून रेड कॉर्नर नोटीसही जारी केली जाणार आहे.
ICU मध्ये दाखल झालेल्या कोरोना रुग्णांना किडनी फेल होण्याचा धोका
टेरर मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड
एजन्सीजनुसार असं सांगितलं जात आहे की, या संपूर्ण घटनेचा खरा मास्टरमाईंड ओसामाचे वडील उसैदूर रहमान आहेत. ज्यांनी पाकिस्तानमध्ये ट्रेनिंग घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, ओसामाचे वडील सध्या दुबईमध्ये आहेत आणि तेथे जे मदरसा चालवतात ते थेट ISIच्या संपर्कात आहे. आता ओसामाच्या चौकशी दरम्यान, या संपूर्ण घटनेत त्याच्या वडिलांची भूमिका स्पष्ट झाली आहे. असे काही चॅटही सापडले आहेत, ज्याच्या आधारे ओसामाचे वडील मास्टरमाईंड म्हणून सांगितले जात आहेत. ISIच्या मदतीनं ओसामा पाकिस्तानात ट्रेनिंगसाठी गेला होता.
10 लाखांचं बक्षिस जाहीर केलेल्या आरोपीचा मृत्यू, रेल्वे ट्रॅकवर सापडला मृतदेह
याशिवाय ओसामाचे काकाही या प्रकरणात आरोपी आहेत. असे म्हटलं जातं की, ओसामाचा काका हुमैदूर रहमान देखील या दहशतवादी मॉड्यूलचा एक भाग आहे. त्याचनं अटक करण्यात आलेल्या जिशानला कट्टरपंथी बनवले आणि त्याला ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला पाठवलं. असं सांगण्यात आलं आहे की, काका हुमैदूर रहमान यूपीमधील प्रयागराजचे रहिवासी आहे आणि सध्या तो फरार आहे. त्याच्या अटकेसाठी एजन्सी सक्रिय झाल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bomb Blast, Mumbai, Pakistan