Home /News /videsh /

किम जोंगने केला कहर, 2017 नंतरचं सर्वात मोठं ‘डेअरिंग’

किम जोंगने केला कहर, 2017 नंतरचं सर्वात मोठं ‘डेअरिंग’

उत्तर कोरियाने 2017 नंतरची सर्वात मोठी मिसाईल टेस्ट केली आहे. यामुळे जगापुढे एक नवी चिंता निर्माण झाली आहे.

    प्योंगयांग, 30 जानेवारी: उत्तर कोरियाचा (North Korea) हुकूमशहा किम जोंग उन (Kim Jong Un) याने गेल्या पाच वर्षातील सर्वात मोठी (Biggest since 2017) मिसाईल चाचणी (Missile Test) केली आहे. 2022 ची सुरुवात झाल्यापासून उत्तर कोरियाने आपली आक्रमकता वाढवली असून सातत्याने मिसाईल टेस्टना सुुरुवात केली आहे. अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून देत आपली क्षमता वाढवण्याच्या आणि तपासण्याच्या प्रक्रियेत किम जोंग कुणालाही जुमानत नसल्याचं यावरून पुन्हा एकदा दिसून आलं आहे. 2017 नंतरची सर्वात मोठी टेस्ट आतापर्यंत छोट्या मोठ्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या उत्तर कोरियाकडून घेतल्या जात होत्या. मात्र नुकतीच घेण्यात आलेली क्षेपणास्त्र चाचणी ही 2017 पासूनची सर्वात मोठी क्षेपणास्त्र चाचणी असल्याचं दिसून आलं आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे 2000 किलोमीटर उंचीपर्यंत उडालेल्या या मिसाईलनं साधारण 800 किलोमीटरचा पल्ला पार केला आणि शेवटी ते जपानच्या समुद्रात जाऊन बुडालं. जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिका या तिन्ही देशांनी या घटनेचा निषेध केला असून उत्तर कोरियाकडून होत असलेली आगळीक हा जगाच्या चिंतेचा विषय असल्याचं म्हटलं आहे. निर्बंधांनंतरही चाचणी उत्तर कोरियाने केलेल्या या वर्षीच्या पहिल्या दोन मिसाईल चाचण्यांनंतर अमेरिकेनं या देशावर निर्बंंध घातले आहेत. मात्र त्याला न जुमानता उत्तर कोरियाकडूनच अमेरिकेला आव्हान दिलं जात आहे. आपली आण्विक क्षमता आणि सज्जता वाढवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून कुठल्याही परिस्थितीत अमेरिका किंवा इतर देशांच्या दबावाला बळी पडणार नाही, असा इशारा किम जोंग उन याने दिला आहे. हे वाचा- अफगाणिस्तानात अडकली गर्भवती महिला पत्रकार, आता तालिबानकडेच मागितली मदत दबाव टाकण्याचा प्रयत्न बदलत्या जागतिक परिस्थितीत आपला दबाव निर्माण करण्यासाठीच उत्तर कोरियाकडून अशा प्रकारची कृती केली जात असल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. कुठल्याही जागतिक संघटनेच्या दबावाला न जुमानणारा आणि अण्वस्त्रसज्ज असणारा देश असल्यामुळे उत्तर कोरिया हा जगासाठी चिंतेचा विषय बनला आहे. या मिसाईल टेस्टनंतर अमेरिका आणि जगातील इतर देश काय पावलं उचलतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Japan, Kim jong un, Missile, North korea, South korea

    पुढील बातम्या