जाहिरात
मराठी बातम्या / विदेश / 'या' देशातल्या नागरिकांना सरकारला द्यावी लागते आपली विष्ठा; दररोज 90 किलो मलत्याग करण्याचे आदेश

'या' देशातल्या नागरिकांना सरकारला द्यावी लागते आपली विष्ठा; दररोज 90 किलो मलत्याग करण्याचे आदेश

'या' देशातल्या नागरिकांना सरकारला द्यावी लागते आपली विष्ठा; दररोज 90 किलो मलत्याग करण्याचे आदेश

शेतीसाठी खत (fertilizer) तयार करण्यासाठी लोकांना मल ऊर्त्सजनाचे हे आदेश देण्यात आलेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

प्योंगयांग, 17 मे : मल ऊत्सर्जन ही नैसर्गिक प्रक्रिया. त्यावर कुणाचं नियंत्रण नसतं. असं असतानाही दररोज तब्बल 90 किलो मलत्याग करा, असे आदेश उत्तर कोरियातल्या नागरिकांना देण्यात आलेत. हे ऐकून थोडं विचित्रच वाटलं असेल. मात्र उत्तर कोरियाचे (North korea) हुकूमशाह किम जोंग उन यांनी असे आदेश दिले आहेत. शेतीसाठी खत तयार करण्यासाठी लोकांना मल ऊर्त्सजनाचे हे आदेश देण्यात आलेत. रेडिओ फ्री एशियामधील रिपोर्टनुसार उत्तर कोरियात प्रत्येक निरोगी व्यक्तील दररोज कमीत कमी 90 किलो मल त्याग करावा लागेल आणि त्यापासू शेतीसाठी खत (fertilizer) तयार करावं लागेल. अशा पद्धतीनं महिनाभरात एक व्यक्ती जवळपास 3 टन मल त्याग करेल. जर इतक्या प्रमाणात ती व्यक्ती मल ऊर्त्सजन करू शकली नाही तर त्याबदल्यात शिक्षेचीही तरतूद करण्यात आली आहे. त्या व्यक्तीला जनावरांच्या मलापासून तयार केलेली 30 किलोग्रॅम खत सरकारला उपलब्ध करून द्यावं लागतं. हे वाचा -  वाईनमुळे सुखावणार महाराष्ट्रातला शेतकरी, सरकारने घेतला मोठा निर्णय फॉक्स न्यूज मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या रिपोर्टनुसार, आतापर्यंत एकही निरोगी व्यक्ती एका दिवसात इतकं मलत्याग करू शकत नाही, त्यामुळे लोकं शिक्षा म्हणून जनावरांचं खत उपलब्ध करून द्यावं लागतं आहे आणि तेही शक्य नाही झालं तर पैसे द्यावे लागतात जेणेकरून सरकारी अधिकारी त्यापासून खत खरेदी करतील. दर आठवड्याला सरकारी लोकं याची नोंद ठेवतात. मानवी विष्ठेपासून खत तयार करण्याची ही कल्पना उत्तर कोरियात खतांच्या कमतरतेतून निर्माण झाली. 2010 साली दक्षिण कोरियाने उत्तर कोरियाला खत देण्यास नकार दिला. कारण उत्तर कोरियाने दक्षिण कोरियाच्या एका नौदल जहाजावर हल्ला केला होता, त्या 46 जण मारले गेले होते. त्यानंतर दक्षिण कोरियानं उत्तर कोरियाशी आपले सारे संबंध तोडले आणि खतासाठी पूर्णपणे आपल्या या शेजारी देशावर अवलंबून असलेल्या उत्तर कोरियात शेतीचं मोठं नुकसान झालं. त्यानंतर मानवी विष्ठेपासून खत केलं जातं. हे वाचा -  फक्त 2 तास राहिलं हे गोड हसू; कोरोनाशी संबंधित आजारानं घेतला चिमुरड्याचा जीव मानवी मल जमा करून सरकारी अधिकाऱ्यांमार्फत कोरियातल्या प्लांटमध्ये पाठवलं जातं, त्यापासून खत तयार करून शेतांमध्ये पोहोचवलं जातं. नुकतंच 20 दिवसांपर्यंत गायब राहिल्यानंतर हुकूमशाह किम जोंग राजधानी प्योंगयांगच्या बाहेर एका खत फॅक्टरीचं उद्घाटन करताना दिसले होते. मात्र गुप्तचर संस्थेच्या मते, ही खतांची फॅक्टरी नाही तर एखाद्या सिक्रेट कारणासाठी बनवण्यात आलेली फॅक्टरी असल्याचा दावा केला आहे. संकलन, संपादन - प्रिया लाड

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात