जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / वाईनमुळे सुखावणार महाराष्ट्रातला शेतकरी, सरकारने घेतला मोठा निर्णय

वाईनमुळे सुखावणार महाराष्ट्रातला शेतकरी, सरकारने घेतला मोठा निर्णय

वाईनमुळे सुखावणार महाराष्ट्रातला शेतकरी, सरकारने घेतला मोठा निर्णय

कोरोनामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं. पण सरकारच्या एका निर्णयामुळे बळीराजा आता सुखावणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नाशिक, 17 मे : कोव्हिड-19 मुळे सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. त्यातलाच एक मोठा वर्ग म्हणजे शेतकरी. नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर मोठं आव्हान उभं ठाकलं होतं. पण सरकारच्या एका निर्णयामुळे बळीराजा आता सुखावणार आहे. देशातील सगळ्यांत जास्त कांदा उत्पादन, एक्स्पोर्ट होणाऱ्या द्राक्षांचा प्रदेश, युरोपियन देशात नियमित होणारी द्राक्षांची निर्यात सगळं ठप्प झालं आहे. यात अवकाळीच्या फटक्यानं उभारी घेणाऱ्या शेतकऱ्यांना या कोरोनानं पुन्हा एकदा जमिनीवर आणलं आहे. कापणीला आलेल्या द्राक्षबागा. एक्स्पोर्टसाठी मेहनतीनं तयार केलेली द्राक्ष आणि अचानक बंद झालेली निर्यात. यामुळे अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत सरकार धावून आलं. सुला विनियार्डनं सरकारला साथ दिली आणि चक्क बळीराजा सुखावला. मुबलक पाणी आणि कसदार जमीन हे खरं तर नाशिक जिल्ह्याला निसर्गानं दिलेलं वरदान आहे. शेनीन, शिराज, कबर्ने, झिनफानदेल अशा अनेक उत्तमोत्तम द्राक्षांच्या जातींनी समृद्ध बागायती कापणीला आली, एक्स्पोर्ट साठी तयार झाली. पण लॉकडाऊननं सगळंच गणित बिघडवून टाकलं. या महागड्या तयार द्राक्षांची बाजारपेठ पार कोसळली. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी तुरुंग प्रशासनाचा मोठा निर्णय अखेर हताश शेतकऱ्यांनी सरकारला साकडं घातलं आणि सुलाने जाणीव ठेवून या शेतकऱ्यांना आधार दिला. रडू येणाऱ्या शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता आनंदाचे अश्रू आहेत. आता वाईन म्हटलं की एक सुंदर पेय डोळ्यापुढे येतं. एक फॅमिली ड्रिंक म्हणूनही आजकाल वाईनची ओळख झाली आहे. द्राक्षापासून तयार होणाऱ्या या वाईन उद्योगामुळं, अनेक द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना आधार दिला आहे. वर्षाला 90 लाख लिटर वाईन उत्पादन करणारी सुला आपल्या देशातील सगळ्यात मोठी वायनरी आहे. 29 राज्यांसह परदेशात एक्स्पोर्ट होणारी ही इंडस्ट्री म्हणजे शेतकऱ्यांची खरी आर्थिक बँक. मात्र, याच शेतकऱ्यांना आपला मानबिंदू मानून सुलानं वाईन ग्रेप्ससह टेबल ग्रेप्सची तब्बल 2 हजार टनची खरेदी करून मोठं पाऊल उचललं आहे. कोरोनाचा धोका वाढला, महाराष्ट्र आणि पंजाबनंतर आता या राज्यानेही वाढवला लॉकडाऊन विशेष म्हणजे सुला फेस्टमुळे हाच परिसर आज जागतिक वाईन पर्यटनस्थळ म्हणूनही ओळखला जातो. मात्र, लॉकडाऊनमुळं त्यांचा हाच परिसर आज निर्मनुष्य झाला असला तरी शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या या वाईनचं कौतूक आहे. डोंबिवलीकरांसाठी दिलासादायक बातमी, स्टेशनवर सुरू झाले महत्त्वाचे काम संपादन - रेणुका धायबर

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona
  • First Published :
जाहिरात
जाहिरात