फक्त 2 तास राहिलं हे गोड हसू; कोरोनाशी संबंधित आजारानं घेतला चिमुरड्याचा जीव

फक्त 2 तास राहिलं हे गोड हसू; कोरोनाशी संबंधित आजारानं घेतला चिमुरड्याचा जीव

हा फोटो पाहून वाटतही नाही की या मुलाला एखादा आजार असावा.

  • Share this:

लंडन, 17 मे : या चिमुरड्याच्या पाहून त्याला एखादा गंभीर आजार झाला असेल, असं कुणालाही वाटणार नाही. कोरोनाव्हायरसच्या (coronavirus) या परिस्थितीत या चिमुकल्याच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून खूप बरं वाटतं आहे. मात्र ज्याचं हास्य पाहून आपल्याला समाधान वाटतं आहे, तो चिमुकला मात्र आता या जगात राहिला नाही. कोरोनाशी संबंधित आजारानं या निरागस मुलाचा जीव घेतला. मृत्यूच्या फक्त 2 तास आधी हा चिमुरडा हसत होता.

यूकेतील अॅलेक्झँडर पर्सन्सला कावासाकी (kawasaki disease) आजार होता. हा कोरोनाव्हायरशी संबंधित आजार आहे, ज्यामुळे रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो. मुलांच्या शरीरावर लाल चकत्या बनू लागतात. याच आजारामुळे अॅलेक्झँडरचा मृत्यू झाला आहे. आईच्या कुशीतच त्यानं आपला जीव सोडला

हे वाचा - 8 दिवसांच्या उपचारानंतरही माजी मुख्यमंत्र्यांची प्रकृती गंभीर. डॉक्टरांची माहिती

डेली मिररशी बोलताना त्याची आई कॅथरीननं सांगितलं, अॅलेक्झँडरच्या त्वचेवर सनबर्नसारखी लक्षणं होती. त्याच्या शरीराचं तापमान वाढलं होतं. त्यानंतर हात आणि पायही लाल पडले.

डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, कावासाकी हा आजार कोरोनाव्हायरशी संबंधित आहे. व्हायरसच्या प्रतिक्रियेमुळे हा आजार होतो.

कॅथरीनला वाटलं की त्याला व्हायरल इन्फेक्शन झालं आहे. त्यानंतर त्यांनी इमर्जन्सी सेवेवर फोन केला. तोपर्यंत मुलाला उलटी सुरू झाली. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. जिथं डॉक्टरांनी त्याला कावासाकी आजार असल्याचं सांगितलं.

हे वाचा - चिंता वाढली! मुंबईला कोरोनासोबत व्हायरल आजाराचा विळखा

हा आजार सामान्यपणे 5 पेक्षा कमी वयाच्या मुलांना होतो. युरोपमध्ये 14 वर्षांच्या मुलांमध्ये असा आजार असण्याची जवळपास 200 प्रकरणं समोर आलीत.

कॅथरीन म्हणाली, डॉक्टर आणि नर्सनी अॅलेक्झँडरला वाचवण्याचे खूप प्रयत्न केले, मात्र त्याला वाचवता आलं नाही. इतर मुलांबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

First published: May 17, 2020, 4:36 PM IST
Tags:

ताज्या बातम्या