Home /News /videsh /

कोरियन कार्यकर्तीचा खळबळजनक दावा: कोरोना काळातही किम जोंग उन 2000 गुलाम स्त्रियांबरोबर करतायत मजा

कोरियन कार्यकर्तीचा खळबळजनक दावा: कोरोना काळातही किम जोंग उन 2000 गुलाम स्त्रियांबरोबर करतायत मजा

वडिलांच्या मृत्यूनंतर सोल, आई आणि बहिणीबरोबर अलिप्त जीवन जगत आहे. वडिलांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी, सोलनं तैवानच्या एका गटाशी त्यांची भेट घेतली होती. वृत्तानुसार, वडिलांच्या निधनानंतर सोल North Korean resistance movement Free Joseon शी संपर्कात होता. (फोटो- AFP)

वडिलांच्या मृत्यूनंतर सोल, आई आणि बहिणीबरोबर अलिप्त जीवन जगत आहे. वडिलांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी, सोलनं तैवानच्या एका गटाशी त्यांची भेट घेतली होती. वृत्तानुसार, वडिलांच्या निधनानंतर सोल North Korean resistance movement Free Joseon शी संपर्कात होता. (फोटो- AFP)

उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन म्हणे 2000 सेक्स स्लेव्ह्जबरोबर क्वारंटाइन होते. पृथ्वीवरचा स्वर्ग समजल्या जाणाऱ्या वॉन्सन कंपाऊंड इथे ते लवाजम्यासह 'विलगीकरणात' होते, असा दावा एका कोरियन कार्यकर्तीने केला आहे.

  नवी दिल्ली, 23 एप्रिल : उत्तर कोरियातल्या (North Korea) मानवाधिकार कार्यकर्त्या येओन्मी पार्क (Human rights activist Yeon-mi Park) यांनी उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन (Kim Jong Un) त्यांची हत्या घडवून आणता आणू शकतात, अशी भीती व्यक्त केली आहे. येओन्मी यांनी आतापर्यंत अनेकदा धोका पत्करून हुकूमशहा किम जोंग उनविरोधात आवाज उठवला आहे. उत्तर कोरियाच्या प्रपोगंडावरही त्या नेहमी त्यांचं मत परखडपणे व्यक्त करत असतात. त्यांच्या किम जोंगसंदर्भातल्या नव्या दाव्याने खळबळ उडाली आहे. पार्क सध्या शिकागो (Chicago) इथे राहत आहेत आणि त्या वारंवार किम जोंग उन (Kim Jong Un) यांच्याबद्दलची सत्य परिस्थिती लोकांसमोर आणत  असतात. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे की, उत्तर कोरियाचा हा हुकूमशहा आपल्यासोबत 2000 गुलाम वेश्यांना (Sex Slaves) ठेवतो.  पार्क यांनी आपल्या जिवाला अमेरिकेतही धोका असल्याचे म्हटले आहे. पार्क यांनी 2007 साली स्वतःच मानवी तस्करी करणाऱ्यांना लाच दिली होती. कारण त्यांना अमेरिकेला पोहोचायचे होते. पार्क यांनी हा निर्णय यासाठी घेतला होता, कारण किम जोंग उन यांनी पार्कच्या कर्करोग झालेल्या वडिलांना भयानक छळछावणीत डांबून ठेवलं होतं. पार्क यांनी दावा केला आहे की, कोरोना काळातही किम दोन हजार गुलाम वेश्यांना सोबत ठेवतो आणि तो त्यांच्यासह पृथ्वीवरील स्वर्ग समजला जाणाऱ्या वॉन्सन कंपाऊंड येथे विलगीकरणात होता. या महिलांना 'प्लेजर स्कॉड' असंही म्हटलं जातं आणि या महिलांना किम जोंग उनसह अनेक हायप्रोफाईल आणि एलिट लोकांचं मनोरंजन करण्यासाठी वापरलं जातं. हे वाचा - घरात शिरलेल्या सापाला पकडून सर्पमित्राने बाटलीने पाजलं पाणी; पाहा घटनेचा VIDEO पार्क जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातात तेव्हा त्यांच्यासोबत सुरक्षारक्षक असतात. त्यांनी सन वेबसाईटशी केलेल्या चर्चेत म्हटलं होतं की, मी मागील अनेक वर्षांपासून मी किम जोंग उन यांच्या टारगेट लिस्टमध्ये आहे. मला ते शोधून काढून मारून टाकतील, अशी भीती नेहमीच असते. मला धमक्याही मिळतात. माझी सिस्टिम अनेकदा हॅक करण्यात आली आहे. त्या पुढे म्हणाल्या की, 'उत्तर कोरियाने मला सार्वजनिकरीत्या देशाची शत्रू घोषित केलं आहे. कारण, मी आणि माझी आई तो देश सोडून पळून गेलो होतो. याशिवाय माझ्या कुटुंबातील तीन पिढ्यांना शिक्षा भोगावी लागत आहे. माझे सर्व नातेवाईक एक तर ठार करण्यात आले आहेत किंवा त्यांना तुरुंगात डांबण्यात आले आहे.' हुकूमशहा किम जोंग उन यांनी 2017 साली त्यांचा सावत्र भाऊ किम जोंग नेम याला एका नर्व एजंटच्या माध्यमातून ठार मारले आले होते आणि ही घटना मलेशियाच्या विमानतळावर झाली होती. उत्तर कोरियन हुकूमशहाचा हा भाऊ तेथील सत्तेवर आपला दावा ठेवू शकत असल्यामुळे ही हत्या करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हे वाचा - सरकारी आकडे खोटे? वर्ध्यात 7 दिवसांत मृतांची संख्या 90, प्रत्यक्षात मात्र 200 रुग्णांवर अंत्यसंस्कार पार्क म्हणाल्या, जमाल खाशोग्गीसारख्या प्रतिष्ठित पत्रकाराला तुर्कस्तानात ज्या पद्धतीने ठार केले त्यावरून ही बाब स्पष्ट होते की, कोणत्याही देशातील हुकूमशहा दुसऱ्या देशातही हत्या घडवून आणू शकतात आणि त्यांना याबद्दल कोणीही कसलीही शिक्षा देऊ शकत नाही. अशा परिस्थितीत मला माझ्या जीवाची नेहमीच काळजी वाटते, असंही त्या सांगतात.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Kim jong un, North korea, South korea

  पुढील बातम्या