कोरोनामुळं घरच्यांनी सोडली साथ! स्मशानाबाहेर एक तास मृतदेह राहिला पडून अखेर...

कोरोनामुळं घरच्यांनी सोडली साथ! स्मशानाबाहेर एक तास मृतदेह राहिला पडून अखेर...

घरापासून दूर राहणाऱ्या या भारतीयाचा दुबईमध्ये मृत्यू झाला. वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी त्यांचा मृतदेह अॅम्ब्युलन्समध्ये स्मशानभूमीसमोर ठेवला होता.

  • Share this:

दुबई, 24 एप्रिल : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. जवळजवळ सर्वच देशातील विमान उड्डाणे बंद करण्यात आली आहेत. त्यामुळं शेकडो लोकं परदेशात अडकले आहेत. संयुक्त अरब अमिराती आणि इतर श्रीमंत आखाती देशांमध्ये हजारो भारतीय काम करतात. काही लोकं आजही तेथे अडकले आहेत. या सगळ्यात एका कर्मचाऱ्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. घरापासून दूर राहणाऱ्या या भारतीयाचा दुबईमध्ये मृत्यू झाला. वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी त्यांचा मृतदेह अॅम्ब्युलन्समध्ये स्मशानभूमीसमोर ठेवला होता. त्यांचा अखेरचा निरोप घेण्यासाठी कोणीतरी येईल अशी कर्मचाऱ्यांना आशा होती. मात्र एका तासानंतरही कोणी आले नाही, म्हणून अखेर या कर्मचाऱ्यांना त्यांचे अंत्यसंस्कार करावे लागले.

कोरोनामुळं या भारतीय कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यामुळं त्यांचे शव मायदेशी पाठवण्यात आले नाही. याबाबत त्यांच्या घरच्यांनाही कळवले होते. मात्र त्यांचे शव स्विकारण्यासाठी कोणीच आले नाही, त्यामुळे अखेर वैद्यकिय कर्मचाऱ्यांनी सर्व अंतिम विधी केले. "संपूर्ण जग बदलत आहे. आता कोणीही येत नाही, कोणीही घरातील लोकांच्या शवांना स्पर्श करत नाही, कोणीही निरोप द्यायला येत नाही", असे दुबईमधील हिंदू स्मशानभूमीचे व्यवस्थापक ईश्वर कुमार यांनी सांगितले. कोरोनाव्हायरसआधी 200 ते 250 लोकं आपल्या प्रियजनांना अखेरचा निरोप देण्यासाठी यायची. आता मात्र लोकांना अखेरचा निरोपही मिळत नाही आहे, असे त्यांनी असोसियट प्रेसला (AP) सांगितले.

वाचा-कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न फसला, चीनने वापरलेलं औषध क्लिनिकल ​चाचणीत फेल

आखाती देशांमध्ये आत्तापर्यंत 166 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 26 हजार 600 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. आतापर्यंत नोंदवलेल्या घटनांपैकी बहुतांश लोक परदेशी असल्याचे आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे. त्यापैकी बहुतेक भारत, पाकिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि फिलिपिन्स सारख्या आशियाई देशातील आहेत.

वाचा-हे इंजेक्शन वापरून बरा होणारा कोरोना, ट्रम्प यांचा दावा खरा की खोटा?

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सर्व व्यावसायिक उड्डाणे थांबविण्यात आली असली आहेत. मात्र घरापासून दूर असलेल्या लोकांना नोकरी नसल्यामुळं त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न समोर आला आहे. मात्र परदेशी लोकांचे अंत्यसंस्कार हे सरकारपुढे मोठे आव्हान आहे. संक्रमित रुग्णांवर कर्मचाऱ्यांनाच दफनविधी करावे लागत आहेत.

वाचा-अवघ्या 6 महिन्याच्या मुलावर लॉकडाऊन तोडल्याचा गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण

First published: April 24, 2020, 12:50 PM IST

ताज्या बातम्या