Home /News /national /

अरेच्चा! अवघ्या 6 महिन्याच्या मुलावर लॉकडाऊन तोडल्याचा गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण

अरेच्चा! अवघ्या 6 महिन्याच्या मुलावर लॉकडाऊन तोडल्याचा गुन्हा दाखल, काय आहे नेमकं प्रकरण

लॉकडाऊनचे नियम तोडल्याने पोलिसांनी चक्क एका 6 महिन्याच्या बाळावर गुन्हा दाखल केल्याचं समोर आलं आहे.

    देहरादून, 24 एप्रिल : लॉकडाऊनमध्ये नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई आपण बातम्यांच्या माध्यमातून पाहिलीच आहे. पण आता लॉकडाऊनचे नियम तोडल्याने पोलिसांनी चक्क एका 6 महिन्याच्या बाळावर गुन्हा दाखल केल्याचं समोर आलं आहे. कोरोना संसर्गामुळे अलिप्त असलेल्या लोकांच्या वतीने उल्लंघन केल्याबद्दल पोलिसांनी 51 जणांवर गुन्हा दाखल केला. यामध्ये आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या लोकांवर हा खटला दाखल करण्यात आला त्यापैकी एक 6 महिन्यांचा आणि एक 3 वर्षांचा मुलगाही होता. ही बाब उघडकीस आल्यानंतर उत्तरकाशीचे डीएम यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले की, बाल कायद्यानुसार 8 वर्षापेक्षा लहान मुलावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही. हे कसे घडले याचा तपास केला जाईल. आता या लहान मुलांवर नेमका कसा गुन्हा दाखल करण्यात आला याचा पोलीस शोध घेत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून हे चुकून झालं असल्याचं सांगण्यात येत आहे. 12 वाजता पंतप्रधानांची अर्थमंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, अर्थव्यवस्थेवर चर्चा 47 लोक संक्रमित अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, राज्यात आतापर्यंत 47 लोकांना कोविड -19 संसर्ग झाला आहे . मंगळवार आणि बुधवारी राज्यात कोरोनाचा कोणताही नवीन विषाणू उद्भवला नाही. उत्तराखंडमध्ये, देहरादूनमध्ये या आजाराने ग्रस्त लोकांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात कोरोनाचे एकूण 47 रुग्ण आहेत, त्यापैकी 25 एकटे देहरादूनचे आहेत. त्याचवेळी नैनीतालमध्ये 9 आणि हरिद्वारमध्ये 7 प्रकरणे उघडकीस आली आहेत. एक नंबर! तुम्ही करून दाखवलं, लॉकडाऊनमुळे या 6 गोष्टींवर केली मात दोन दिवस कोणालाही संसर्ग झालेला नाही यापूर्वी मंगळवार आणि बुधवारी संक्रमित रुग्ण आढळले नाहीत म्हणून प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला. परंतु गुरुवारी रुग्ण सापडल्यानंतर संक्रमित लोकांची संख्या 47 वर पोहोचली. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व संक्रमित लोकांपैकी सुमारे 23 लोक पूर्ण बरे होऊन घरी पोहोचली आहेत. गौतम गंभीरने केला महिलेचा अंत्यसंस्कार, 6 वर्षांपासून करत होती घरी काम
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या