Home /News /videsh /

हे इंजेक्शन वापरून बरा होणारा कोरोना, ट्रम्प यांचा दावा खरा की खोटा?

हे इंजेक्शन वापरून बरा होणारा कोरोना, ट्रम्प यांचा दावा खरा की खोटा?

कोरोना-संक्रमित व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नवीन सिद्धांत मांडला आहे.

    वॉशिंग्टन, 24 एप्रिल : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) नेहमी आपल्या अजब वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. कोरोनाव्हायरसच्या उपचारात मलेरिया औषध हायड्रोक्सीक्लोरोक्विन (Hydroxychloroquine) उपयुक्त असल्याचे वर्णन करणारे ट्रम्प यांनी यावेळी कोरोना-संक्रमित व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी नवीन सिद्धांत मांडला आहे. ट्रम्प यांच्या मते. कोरोनामुळे रुग्णाच्या फुफ्फुसांचे सर्वाधिक नुकसान होते, म्हणूनच त्याच्या फुफ्फुसांत इंजेक्शनने देऊन ते स्वच्छ केले तर, कोरोना बरा होईल. व्हाइट हाऊस येथे पत्रकारांशी केलेल्या चर्चेच ट्रम्प सांगत होते की नवीन संशोधनातून असे दिसून आले आहे की कोरोना विषाणूचे वर्तन वेगवेगळ्या तापमान, हवामान आणि पृष्ठभागांवर कसे बदलत आहे. संभाषण दरम्यान ट्रम्प यांनी अचानक दावा केला, "मी पाहिले की फुफ्फुसातील संसर्ग क्षेत्र कसे स्वच्छ केले जाते. आम्ही फुफ्फुसांच्या आत इंजेक्शन देऊन असे काहीतरी करू शकतो जेणेकरून आतील संसर्ग साफ होईल. हे साफसफाईसारखे काहीतरी असू शकते. कारण हा विषाणू फुफ्फुसांवर सर्वाधिक परिणाम करतो आणि यामुळे सर्वाधिक मृत्यू होतो. आपण याबद्दल शोधले पाहिजे, त्याबद्दल डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, परंतु ही कल्पना खूप चांगली दिसते". ट्रम्प यांच्या या दाव्यावर उपस्थितांनी मात्र मौन बाळगले. वाचा-USचा खुलासा: कोरोनाच्या उपचारावर 'हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन'चा फायदा नाही ट्रम्प बोलतच राहिले, तज्ज्ञ होते शांत व्हाईट हाऊस कोरोना टास्क फोर्सचे समन्वयक डेबोरा ब्रिक्स तेथे उपस्थित होते, त्यावेळी ट्रम्प कोरोना संसर्ग दुरुस्त करण्यासाठी सिद्धांत देत होते, तरीही त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली नाही. मात्र, ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर त्यांची सोशल मीडियावर खिल्ली उडण्यास सुरूवात झाली. बर्‍याच लोकांनी म्हटले की हे असेच सुरू राहिल्यास ट्रम्प यांना काही दिवसांत अल्ट्रा व्हायलेट किरणांनी कोरोना विषाणू नष्ट करावयास हवे. वाचा-'...तर याची मोठी किंमत मोजावी लागेल', चीनने भारताला दिली धमकी डॉक्टरांनी हा दावा खोटा असल्याचे सांगितले आहे. गार्डियनच्या म्हणण्यानुसार ट्रम्प यांच्या या दाव्यास बर्‍याच डॉक्टरांनी नकार दिला आहे आणि फुफ्फुसांचा उपचार किंवा अल्ट्रा व्हायलेट किरणांवरील उपचारांना वेडेपणा असल्याचे म्हंटले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठातील प्राध्यापक रॉबर्ट रायख यांनी डॉक्टरां व्यतिरिक्त म्हटले आहे की- "चुकीची माहिती सांगणारे ट्रम्प सामान्य लोकांच्या जीवनासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतात. असा प्रचार नाकारला पाहिजे. फक्त डॉक्टर आणि तज्ञांचे ऐका आणि फुफ्फुसे साफ करण्यासाठी कृपया काहीही पिऊ नका". ट्रम्प यांच्या या दाव्यानंतर ट्विटरवरील लोकांनी त्यांच्यावर बरीच टीका केली आहे. वाचा-चीनच्या खोटारडेपणामुळं वाढल्या जगाच्या शंका, सर्वात धक्कादायक आकडेवारी आली समोर संकलन, संपादन-प्रियांका गावडे
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या